मोतीलाल ओसवाल फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) चे सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रामदेव अगरवाल यांनी एक मोठं भाकीत केले आहे. रामदेव अगरवाल यांचं भाकीत भारतीय बाजारपेठेत उत्साह वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. भविष्यात चांगल्या परताव्यांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी भारतीय बाजारपेठ अत्यंत योग्य असल्याचंही या विधानामुळे अधोरेखित होत आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीय बाजारपेठांमध्ये नवचैतन्य येताना पाहायला मिळतंय. अशातच रामदेव अगरवाल यांच्या मते सध्या 51 हजारांवर असणारा सेन्सेक्स भविष्यात आपल्याला 2 लाखांपर्यंत पोहोचलेला पाहायला मिळेल. (Raamdeo Agrawal sees Sensex at 200,000 in the next 10 years)

Also Read: SBIच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; जाणून घ्या नियमावली

share and stock market

कधी पाहायला मिळणार दोन लाखांचा आकडा ?

पुढील दहा वर्षांमध्ये सेन्सेक्स 2 लाखांचा टप्पा गाठेल असं रामदेव अगरवाल म्हणाले. 2029 पर्यंत भारत पाच लाख करोडची अर्थव्यवस्था बनणार असल्याचं अगरवाल यांना वाटतं. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची व्हावी हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील स्वप्न आहे. सेन्सेक्सची सध्याची वार्षिक बढत सरासरी 15 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर भारताच्या GDP मध्येदेखील चांगली वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना किंवा नोटबंदी नंतरही सेन्सेक्समध्ये गेल्या दहा वर्षात सरासरी 11 टक्के कंपाउंड अन्युअल ग्रोथ रेट राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. म्हणजेच कठीण काळातही सेन्सेक्सने चांगली वाढ दाखवली आहे. येणारा काळ भारतासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला मानला जातोय. अशात येत्या काळात भारतीय बाजारपेठांमध्ये येणारी गुंतवणूक पाहता सेन्सेक्स तब्बल 2 लाखांचा टप्पा गाठेल असा विश्वास रामदेव अगरवाल यांना व्यक्त केलाय.

Also Read: ‘जीडीपी’ला येणार ‘अच्छे दिन’!

stock market

केवळ रामदेव अगरवालाच नव्हे तर इतर मार्केट तज्ज्ञांनी देखील भारतीय शेअर बाजारात मोठ्या अवधीसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या मते देखील भारतीय शेअर बाजार मोठया अवधीच्या गुंतवणुकीसाठी योग्य असल्याचं म्हटलंय. यासाठी भारतीयांनी भारतीय शेअर बाजारावर विश्वास दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलंय.

नोंद : शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here