जळगाव : शहरातील रिंगरोडवर बेवारस स्थितीत सापडलेली सायकल (Bicycle) पोलिस ठाण्यात (district police station) आणून त्याचा शहरातील विक्रेता, विक्रेत्याकडेच चेसिस नंबरवरून बिल-चेकच्या नंबरवरून खरा मालक शोधत एका मेडिकल (medical) दुकानदाराला परत देण्यात आली. विशेष म्हणजे चोरीला (Theft)गेलेल्या सायकलीची कुठलीच पोलिस तक्रार केली नसताना पोलिसांनी तिच्या नंबरवरून मालकाचा शोध लावून ती परत मिळवून दिल्याने सायकल मालकालाही हायसे वाटले.

(steal bicycl recovered police came to house)

Also Read: ‘मीच होतो दुनियेतून ऑफ’ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

एरवी, शहरात मोठमोठ्या घरफोड्या होतात. परंतु तक्रार देण्यास नागरिक टाळाटाळ करतात. दिलीच तर नावापुरती तक्रार देतात. नंतर तपास लागो ना लागो, अशा भूमिकेत ते असतात. शहरातून दिवसाला दहा ते बारा मोटारसायकली चोरीला जात असताना, चोरीला गेलेली सायकल परत मिळेल हे कुणी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. म्हणूनच मयूर केदारनाथ मालू यांनीही सायकल चोरीला गेली तरी तक्रार केली नाही.

Theft

मात्र, २४ मेस जिल्‍हा पेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रवीण भोसले, योगेश ठाकूर, प्रशांत पाठक गस्त घालत असताना त्यांना एक बेवारस सायकल आढळून आली. ती सायकल उचलून त्यांनी पोलिस ठाण्यात आणली. ऐरवी बेवारस वाहने पोलिस ठाण्यात सडत असताना, या सायकलच्या चेसिस नंबरवरून भोसले यांनी स्टॉकिस्ट शोधला.

Also Read: किरकोळ वादातून सुनेकडून सासूचा खून !

स्टॉकिस्टकडे बिलबुकमधील चेकवरून मालकाचे नाव शोधून काढत मयूर केदारनाथ मालू (पद्मालय मेडिकल, शिक्षकवाडी, बालाजी अपार्टमेट) यांच्या घरी जाऊन पोलिसांनी दार ठोठावले. घडलेला अनपेक्षित प्रकार, त्यात चोरीला गेलेली नवी सायकल घेऊनच पोलिस धडकल्याने मालू कुटुंबीयांना आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here