सातारा : शाळा-महाविद्यालयात प्रवेश (school college admission) असो अथवा नोकरी (job) किंवा आयुष्यातील महत्वाच्या बाबींसाठी याबराेबरच परदेश वारी (foriegn tour) साठी आपल्याला जन्म दाखल्याची (birth certificate) आवश्‍यकता असते. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्म दाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. परंतु काही वेळेला दाखल घेणे राहून जाते. परंतु आता नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. साधारतणतः 1969 पूर्वी अथवा त्यानंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून दाखला मिळवण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. नागरिकांच्या मागणीनूसार आणि वंचित राहिलेल्यांना नावाशिवाय राहिलेल्यांना जन्म नोंदणी करता यावी यासाठी पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्य विभागाने संधी उपलब्ध केली आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार आरोग्य सेवा उपसंचालकांनी राज्याच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना केला आहे. (maharashtra-news-include-childs-name-in-birth-certificate-appeals-maharashtra-government)

पूर्वीच्या काळी गर्भवती मातांसाठी (pregnant women) प्रसूती व्यवस्था नसल्याने घरातच प्रसूती होत असे.त्यामुळे बाळाच्या जन्माची नोंद केली जात नसे अथवा करायची राहून जायची. शहरी भागातही दवाखान्यात जन्मलेल्या बाळांच्या जन्माची नोंद दवाखान्याची माध्यमातून केली जात असे. परंतु अनेक कुटुंब बाळाचे जन्म दाखलेच स्थानिक स्वराज्य संस्थेतून घेत नसत. त्यामुळे नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांस जन्म नोंदणीत नावाची नोंद करून जन्मदाखले मिळवण्याची संधी पुन्हा एकदा शासनाने उपलब्ध केली आहे.

Also Read: माझा ढाण्या वाघ परत आला; अस्मानी संकटांशी झुंजलेल्या सुपुत्राला ‘आई’चा कडक सॅल्युट!

शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेद्वारे ज्या नागरिकांच्या जन्माच्या नोंदणीला 15 वर्षाचा कालावधी पुर्ण झाला. परंतु नाव नाेंदविले गेले नाही. अशा सर्व नागरिकांना जन्म नोंदणीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे. किंबहुना नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांना जन्माची नोंद करता येणार आहे. ही मुदत केवळ 27 एप्रिल 2026 पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून दिला जाणार नाही असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र (दहावी, बारावी) , पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी 2 पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

जन्म नोंदीपासून वंचित नागरिकांना नेहमीच सहकार्य केले जाते. तरीही जन्म नोंदीत नाव समाविष्ट करण्यासाठीची मुदत 14 मे 2020 पर्यंत हाेती. ती आता 27 एप्रिल 2026 पर्यंत झाली आहे.

याबराेबरच जन्म व मृत्यू विभागात याेग्य कागदपत्र, प्रमाणपत्राच्या माध्यमातून जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम व महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 नियम 10 नुसार न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जन्म नाेंदणी देखील मिळवता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Also Read: उदयनराजे, संभाजीराजे,शिवेंद्रराजेंचे नेतृत्व मान्य केले जाईल ?

काही सुखद बातम्या वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here