अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात ज्या भागात सिंचनाची सुविधा आहे. अशा भागात केळीच्या बागा नैसर्गिक, मानवनिर्मित संकटांना तोंड देत टिकून आहेत. अर्धापूर तालुक्यातील व परिसरातील तालुक्यातील केळीचे साम्राज्य आजही उत्तर भारतात टिकून आहे. गेल्या काही दिवसात केळीच्या मागणीत वाढ झाल्याने भावात सुधारणा झाली आहे. केळीच्या व्यापारातून कोट्यवधीची उलाढाल व हजारोंना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत असतो. कोरोनाच्या काळातही शेतकरी टिकून आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, हदगाव आदी भागात व शेजारच्या परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील काही तालुक्यात केळीची लागवड केली जाते. केळीच्या बाबतीत हा भाग हरितपट्टा ( ग्रीन बेल्ट ) म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही वर्षात केळी उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
या भागात केळीच्या लागवडीसाठी लागणारे वातावरण, पाणी, जमीन असल्यामुळे केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षी सुरु झालेले कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन यांचा परिणाम केळीच्या मागणीवर व भावावर झाला. गेल्या काही दिवसात केळीच्या भावात सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांत समाधाचे वातावरण आहे.
केळीची लागवड, खते व पाणी नियोजन बागांची निगा, ऊन, वारा, थंडी यापासुन संरक्षण करुन केळीच्या बागांचे संरक्षण करावे लागते. काढणी पश्चात विशेष काळजी घ्यावी लागते. केळीच्या घडाची कापणी, वाहतूक, पॅकिंग, ब्रॅडींग, शितगृह साखळी निर्माण करुन भारतातील विविध राज्यात पाठविली जाते.उत्तर भारतात विशेष मागणी आहे. तसेच परदेशात ही पठवली जाते. यासाठी विशेष दर्जेदार केळीला मागणी असते. त्यादृष्टीने केळीचे उत्पादन केले जाते. पंजब, हरियाना, जम्मू काश्मीर आदी राज्यासह देशातील ईतर भागातही केळी पाठवली जाते.
संपादन- प्रल्हाद कांबळे




Esakal