“पळत असतानाच या कर्जबुडव्यांना रोखण्याची तत्परता मोदींनी का दाखवली नाही?”

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मेहुल चोक्सी यांचा उल्लेख मेहुलभाई… मेहुलभाई असा करायचे. मग हा मेहुलभाई (Mehul Choksi) देशातून पळालाच कसा? अशी खोचक विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. “मेहुल चोक्सी किंवा त्याच्यासारख्या कर्जबुडव्यांना (Fugitive) भारतात आणून शिक्षा दिली पाहिजे यात कोणतेही दुमत नाही. पण जेवढी तत्परता या कर्जबुडव्यांना भारतात आणण्यासाठी दाखवली जात आहे, तेवढीच तत्परता मेहुलभाई भारताबाहेर पळून जाताना का दाखवण्यात आली नाही? असा सवाल मलिक यांनी केंद्र सरकारला (Central Govt) केला. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेबाबत (Extradition) काही तिढा निर्माण होत असल्याची चर्चा आहे. पण भारत सरकार मेहुल चोक्सीला देशात आणण्यावर ठाम आहे. याच मुद्द्यावर मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. (NCP Leader Nawab Malik slams Pm Modi Govt over Mehul Choksi Extradition Vijay Mallya Nirav Modi Issue)

Also Read: “मेहुल चोक्सीला भारताकडं सोपवा”; डॉमिनिका सरकारची कोर्टाला विनंती

PM-Modi-Nawab-Malik

“मेहुल चोक्सीला भारतात आणलं जातंय ही नक्कीच चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय. याबाबत मला आश्चर्य वाटतंय. मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे पण नीरव मोदी… विजय मल्ल्या… यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे, त्या साऱ्यांना पुन्हा भारतात केव्हा आणलं जाणार?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Fugitive-Mehul-Choksi

Also Read: मेहुल चोक्सी प्रेयसीसह ट्रिपला गेला आणि अडकला?

“मधल्या काळात अनेक लोक कर्ज बुडवून फरार झाले. मेहुल चोक्सीदेखील त्यातलाच एक आहे. मेहुल चोक्सीला पुन्हा देशात परत आणलं जातंय हे उत्तम आहे. त्याचं मार्केटिंगदेखील केलं जातंय. पण खरा मुद्दा हा आहे की तो पळालाच कसा? कर्जबुडवे लोक भारतातून बाहेर पळतातच कसे? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता याबद्दलचे प्रश्न सरकारला विचारून लागली आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना या कर्जबुडव्यांना रोखण्याची तत्परता मोदींनी का दाखवली नाही असा प्रश्न आजही जनतेच्या मनात आहे”, असेही नवाब मलिक म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here