मुंबई : एकीकडे मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत महिलेचा मृत्यू होतो. तर, दुसरीकडे एक्सप्रेसमध्ये 8 वर्षीय मुलीवर अत्याचार होतो. त्यामुळे पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी, ‘कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई अपेक्षित आहे. तसेच, दोन्ही घटनेतील महिलेच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने आर्थिक सहाय्य करावे’, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. (Question-of-Women-Safety-in-express-and-mumbai-locals-BJP-Chitra-Wagh)
कळवा रेल्वे स्थानकात मोबाइल चोराशी झालेल्या झटापटीत विद्या पाटील (35) या नोकरदार महिलेचा अपघाती मृत्यू झाला. तर, सातारा जिल्ह्यातील लोणंद ते वाठार दरम्यान वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. मुलीने अत्याचारास विरोध केल्याने आरोपीने चालत्या एक्स्प्रेसमधून मुलीला बाहेर फेकण्यात आले. यामध्ये सुदैवाने मुलीचा जीव वाचला. दोन्ही घटनेतील आरोपींना पकडण्यात आले आहे. मात्र, वारंवार घटना होत असल्याने रेल्वे प्रशासनाला, सुरक्षा व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी बुधवारी, (ता. 2) रोजी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, मध्य रेल्वेचे रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांची भेट घेतली.
Also Read: ‘कोंबडीला अॅसिडिटी’; घराबाहेर पडण्यासाठी इसमाची अनोखी शक्कल
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. वाईट या गोष्टीचे वाटते की, माणसे गेल्यानंतर यावर चर्चा होते. लोकल प्रवासात पॅनिक बटणाची माहिती अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर दोन आणि मध्य मार्गावर एका उत्तम रेकमध्ये पॅनिक बटणची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

200 लोकलमध्ये महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महिला डब्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंतसुरक्षा रक्षक असतो, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी चर्चेत सांगितले. मात्र, निवडक क्षेत्रातील प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा असल्याने गर्दी कमी आहे. त्यामुळे सायंकाळी 6 पासून सुरक्षा रक्षक कर्तव्यावर ठेवण्यात यावेत. स्मार्ट सहेली मोहिमेची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचलविण्यासाठी पावले उचलावीत. दर तीन महिन्यांनी रेल्वे प्रवासी संघटनांशी संपर्क साधून चर्चा करावी. प्रवाशांचे प्रश्न समजून त्याचे निरासन करावे. तर, रेल्वे प्रशासनाने दोन्ही घटनेमधील महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करावे. राज्य सरकारने सुद्धा मनोर्धैये योजनेतून लोणंद येथील 8 वर्षीय पीडितेला अर्थसहाय्य व पुर्नवसन करावे, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
संपादन : शर्वरी जोशी
Esakal