नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी व हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याचा जामीन अर्ज डोमिनिकाच्या न्यायालयात गुरुवारी फेटाळला. चोक्सीने अँटिग्वाहून डोमिनिकात अवैध प्रवेश केल्याबद्दल ही सुनावणी झाली. त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. (Mehul Choksi Denied Bail By Dominica Court In Illegal Entry Case)

डोमिनिका चायना फ्रेंडशिप रुग्णालयात उपचार घेत असलेला चोक्सी (वय ६२) व्हिलचेअरवरुन न्यायालयात आज हजर झाला. त्‍याने निळ्या रंगाचा टीशर्ट व काळे बूट घातले होते. ‘डोमिनिकात अवैध प्रवेशाबद्दल दोषी नसल्याचे सांगत माझे अपहरण झाले होतो व जबरदस्तीने मला डॉमिनिकात आणले,’ असा दावा त्याने न्यायालयात केला. डोमिनिकात प्रवेश केल्याप्रकरणात अनेक बिगर डॉमिनिकन नागरिकांना यापूर्वी जामीन देण्यात आला असूनन त्याच धर्तीवर माझ्या अशिलालाही जामिन मिळावा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी

Also Read: येमेनच्या ३५ मच्छीमारांना मिळाली ‘अशी’ गोष्ट; जीवनच बदलले!

चोक्सी पळून जाण्याची शक्यता?

न्यायदंडाधिकारी कँडिया कॅरेटी-जॉर्ज यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत चोक्सी हा पळून जाण्याची शक्यता व्यक्त करीत तो ‘उड्डाण जोखीम’ या वर्गात मोडत असल्याने त्याला जामीन देऊ नये, असा मुद्दा डोमिनिकन सरकारने मांडला. चोक्सीची डोमिनिकाशी कोणतीही बांधिलकी नसल्याने जामीन दिल्यानंतर त्याला देशातून पळून जाण्यापासून रोखता येणार नाही, अशी बाजू सरकारी वकील शेरमा डार्लिम्पल यांनी मांडली. बचाव पक्षाचे वकील वेन नोर्डे म्हणाले की, चोक्सीची सध्याची प्रकृती पाहता तो पळून जाणाच्या स्थितीत नाही. शिवाय अँटिग्वा आणि बार्बुडा येथे त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित असल्याने तो डोमिनिका सोडू शकत नाही. नव्या जामीन कायद्यातील तरतुदीनुसार आरोपीवरील गुन्हा गंभीर नसेल तर दिलासा मिळण्यास तो पात्र ठरतो, असेही वकील म्हणाले. याप्रकरणाची सुनावणी येत्या १४ पर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे.

Also Read: HSC Exam: महाराष्ट्रात बारावीची परीक्षा अखेर रद्द

चोक्सी भारताच्या ताब्यात येईल

मेहुल चोक्सीसंबंधी डोमिनिकन न्यायालयात झालेल्या सुनावणीचा संदर्भ लक्षात घेता त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल, अशी शक्यता वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी ‘एनआयए’शी बोलताना व्यक्त केली. तेथील न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी परराष्ट्रीय पातळीवरही कायदेशीर प्रयत्न होत आहेत. या दोन्ही पातळीवरील प्रयत्न फळाला येऊन फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणले जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here