पुणे : गेल्या काही दिवासात कोरोना रुग्णांच्या आकेडेवारी सातत्याने कमी होत आहे. आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांचा दर (weekly Covid positivity rate) जास्त असलेल्या 10 जिल्ह्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्याचा आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांचा दर 14.23 टक्के असून राज्याच्या सरासरी (आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांचा दर 8.47 टक्के) पेक्षा जास्त आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या नव्या अहावलानुसार आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्या जास्त आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे
स्टेट सर्व्हेलेन्स ऑफिसर डॉ. प्रदीप आवटे यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, जुन महिन्याच्या अखेरपर्यंत निर्बंध हळू हळू कमी केले जातील. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना स्थिती वेगवेगळी आहे. वर्षाच्या सुरवातीला अमरावती आणि आकोला सारख्या काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती तर पश्चिम महाराष्ट्रात नंतरच्या काळात ही संख्या वाढत गेली.
Also Read: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी शास्त्रज्ञांची ‘अष्टसूत्री’

अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या (1 जुन पर्यंत2.3लाख सक्रीय रुग्ण) पाहता गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 3 लाखांवर पोहोचलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये 24 टक्कयांनी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या 1 जुनपर्यंतच्या आकेडवारीच्या अहावालानुसार, महाराष्ट्राचा आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांचा दर 8.47 टक्के इतका आहे. मे महिन्यात 5 ते 11 दरम्यान, आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांचा दर 22.57 टक्के इतका होता जो 26 मे ते 1 दरम्यानच्या कालावधीत 8.47 टक्के पर्यंत घसरला आहे.
13 जिल्ह्यांचा आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांचा दर राज्यातील सरासरीपेक्षा जास्त होता. यामध्ये रायगड (18.59 टक्के), रत्नागिरी, (17.32 टक्के), सातारा (16.73 टक्के) सांगली (16.10 टक्के), कोल्हापूर (16.04 टक्के), पुणे(14.23 टक्के), बुलढाना( 13.96 टक्के),सिंधूदुर्ग (13.19टक्के), बीड(9.06 टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Also Read: सकाळ इम्पॅक्ट : ऑक्सिजनअभावी बंद पडलेले उद्योग सुरू होणार!
1 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुण्यात 30092 तर साताऱ्यात 20777, मुंबईत 20174, कोल्हापूरात 18590, ठाण्यात 18339 इतकी सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या असून राज्यात एकूण 2.30 लाख रुग्ण कोरोना बाधित आहे. सध्या त्यापैकी 44036 रुग्णांची स्थिती गंभीर असून 15854 रुग्ण अति दक्षता विभागात आहे.
राज्यात नागपूर, यवतमाळ, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदीया, धुळे, जालना, नांदेड आणि जळगाव या 9 जिल्ह्यांमध्ये आठवड्याचा कोरोना बाधित रुग्णांचा दर कमी होता.
Esakal