या लेण्या सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेतयामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १ – १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ – २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० – ३४) लेणी आहेत इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले होतेयुनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केलावेरूळच्या लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेतअप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्खू यांच्या शिल्पही या लेण्यात पहायला मिळतेइथले कैलास मंदिर हे जगामध्ये स्थापत्यशास्त्रातील एक अदभुत कलाकृती आहेया लेण्यापैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहेदहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली आहेही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होतीइथले भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहेया ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्धमूर्ती आहेप्रार्थनागृह असलेले १० क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे या लेण्यात वैशिष्ट्यपूर्ण मानले जातेया वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत.गौतम बुद्धाची शिल्पे, बोधिसत्वांच्या मूर्ती, यांची शिल्पे येथे प्रामुख्याने पहायला मिळतातया लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने, स्वयंपाकघर, अशी रचना दिसते