कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. ते तातडीने कमी व्हावे, यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Center) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावोगावी टेस्टींग वाढवावे. आवश्यकता असल्यास पोलिस (Police) बंदोबस्तातही टेस्टींग करावे. गावोगावच्या विलगीकरण कक्षास आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचना प्रांताधिकारी उत्तम दिघे (Uttam Dighe) यांनी आज केल्या. (Uttam Dighe Warns To Officers On Vaccination In The Meeting Of Task Force In Karad Satara Marathi News)

प्रांताधिकारी दिघे यांच्या दालनात आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टास्क फोर्सची बैठक झाली.

प्रांताधिकारी दिघे यांच्या दालनात आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टास्क फोर्सची (Task Force) बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. संजयकुमार पाटील, शारदा क्लिनीकचे डॉ. चिन्मय एरम, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार, तालुका नर्सिंग अधिकारी अनिता कदम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Also Read: VIDEO पाहा : 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला अवघ्या 15 मिनिटांत ‘जीवदान’

प्रांताधिकारी दिघे म्हणाले, सातारा जिल्ह्यात कऱ्हाडमध्ये बाधितांची संख्या सर्वाधिक होवू नये यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाधितांच्या संपर्कातील लोकांचेही टेस्टींग करणे आवश्यक आहे. गावोगावी कोरोना टेस्टींगची (Corona Testing) शिबिरे घेवून तपासणी करावी. जिथे आवश्यक असेल, तेथे पोलिस बंदोबस्तात तपासणीसाठी लोक न्यायचीही तयारी ठेवावी. अन्यथा बाधितांची संख्या वाढून कऱ्हाड तालुका हॉटस्पॉट (Karad Taluka Hotspot) होईल. त्यासाठी तातडीने उपाययोजना राबव्या. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिंदे यांनी लसीकरण, टेस्टींग संदर्भात मार्गदर्शन केले.

Also Read: शिक्षकांसाठी जिल्हाधिका-यांनी दिला आदेश; तातडीने कार्यवाही करा

Vaccination

लसीकरणात वशीलेबाजी चालणार नाही

कोरोनाचे लसीकरण करताना वशीलेबाजी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतः लक्ष देवून असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सांगूण प्रांताधिकारी दिघे यांनी लसीकरणात वशीलेबाजी, पुढाऱ्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशीही ताकीद दिली.

Uttam Dighe Warns To Officers On Vaccination In The Meeting Of Task Force In Karad Satara Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here