कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत भारतीय पुरुष संघासह महिला क्रिकेट संघही इंग्लंडमध्ये पोहचला आहे. भारतीय महिला संघाच्या डावाची सुरुवात करणारी स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) इंग्लंड दौऱ्यावरील सवयीचा किस्सा शेअर केलाय. इंग्लंड असा एकमेव देश आहे ज्या दौऱ्यावर मी लवकर उठते, असे स्मृतीने म्हटले आहे. भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिकेसह जवळपास सात वर्षानंतर कसोटी मालिका खेळणार आहे.

Also Read: ENGvsNZ : कॉन्वेनं षटकार खेचत तोऱ्यात साजरं केल द्विशतक!
स्मृती मानधना (Smriti Mandhana) म्हणाली की, मी अधिक झोप घेण्याला पसंती देते. पण इंग्लंडमध्ये आल्यावर माझी ही सवय बदलते. कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी अधिक झोप घेत असते. पण इंग्लंड एकमात्र देश आहे ज्या ठिकाणी मी लवकर उठते, असे तिने म्हटले आहे. याठिकाणी मी लवकर झोपते आणि लवकर उठते. इंग्लंड दौऱ्यावर नेहमीच पहाटे साडेपाच ते सहापर्यंत उठते, असा किस्सा स्मृतीने शेअर केलाय. भारतीय महिला संघ पुन्हा नव्याने नियुक्ती केलेल्या रमेश पोवार (Ramesh Powar) यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडला पोहचली आहे

Also Read: जेवढे चेंडू बॅटला लागतील तेवढ्या बाईक देईन; अख्तरचं चॅलेंज
Esakal