सांगली : मान्सुनपुर्व पावसाने (heavy rain) आज शहरात दमदार इंट्री घेत शहराची पार दैना उडवली. शहरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली असून नाले आणि गटारी ओव्हरफ्लो (sangli rain update) झाल्या आहे. शामरावनगरसह उपनगरात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले होते. पालिकेच्या मान्सुनपुर्व मोहिमेचा पार फज्जा उडाल्याचे पहिल्याच पावसात स्पष्ट झाले.
शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून उनामुळे अंगाची लाहीलाही होत होती. तापमान (temperature) ३६ अंश सेल्सीअसच्या जवळपास होते. हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढग जमा झाले. मान्सुनपुर्व पावसाच्या हजेरीचे संकेत मिळत असतानाच दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाली. सुमारे तासभर पावसाने शहराला झोडपले. शहर आणि उपनगरात पावसाने जोरदारी हजेरी लावली. नुकतीच लॉकडाउनमध्ये (lockdown) शिथीलता देण्यात आल्याने रस्त्यावरही काही प्रमाणात गर्दी होती. जोरदार झालेल्या पावसाने सारे रस्ते ओस पडले होते.
Also Read: चहाची तलप महागात! विलगिकरणातील पॉझिटिव्ह चहासाठी एकाच्या घरी
तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख मार्ग व अंतर्गत रस्ते जलमय झाले. सखल भागात पाण्याची अक्षरशः तळी साचली होती. स्टेशन रोड, राजवाडा चौक, पटेल चौक, झुलेलाल चौक, बसस्थानक परिसर, गावभाग, मारूती चौक, विश्रामबाग चौक, शामरावनगरसह उपनगरात पाणी साचून राहिले. अपार्टमेंटच्या तळघरात पाणी साचून राहिले. तर शहरातील नाले आणि गटारी तुडुंब झाल्या होत्या. पहिल्या पावसात शहराची पार दैना उडाली. सायंकाळी सातपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
चेंबर पुन्हा ब्लॉक
स्टेशन रस्ता, मारूती चौक, गावभागसह उपनगरातील ड्रेनेजचे चेंबर काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या यंत्रणेकडून सुस्थितीत करण्यात आली होते. मात्र, पहिल्याच पावसात सारे चेंबर पुन्हा ब्लॉक झाल्याचे प्रत्येय आला. स्टेशन चौक, मारूती चौकात गुडभर पाणी सायंकाळपर्यंत साचून राहिले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प होती.

Also Read: बेस्ट गुरुजी! 2 शिक्षकांनी केला धनगरवाड्यावरच्या शाळेचा कायापालट
भाजीविक्रेत्यांची तारांबळ
लॉकडाउनमध्ये दोन दिवसापूर्वीच शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी मंडई परिसरात आज सकाळी भाजीविक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
Esakal