सातारा : शेळी व मेंढीचे दूध आरोग्यासाठी (Health), तसेच शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय म्हणून उपयुक्त आहे. उस्मानाबादी व सानेन या जातीच्या शेळींचे शेतकऱ्यांना (Farmer) संगोपनासाठी वाटप करण्याचा मानस आहे. शिवाय माडग्याळी मेंढीचे संवर्धन करणार असल्याचेही पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी सांगितले. (Minister Sunil Kedar Visit Punyashlok Ahilyadevi Sheep-Goat Development Project At Dahivadi)

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर वाढीव निधी देण्यात येईल. तसेच पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता दिल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री श्री. केदार यांनी आज दहिवडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रास (Punyashlok Ahilyadevi Sheep-Goat Development Project) भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ, रणजितसिंह देशमुख, संचालक डॉ. शशांक कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. सुरेश जाधव, एम. के. भोसले, विश्वंभर बाबर, अशोक गोडसे, दादासाहेब काळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरिफ इनामदार, डॉ. बी. एन. मदने, डॉ. चंद्रकांत खाडे, डॉ. पांडुरंग येडगे आदी उपस्थित होते.

Also Read: VIDEO पाहा : 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला अवघ्या 15 मिनिटांत ‘जीवदान’

Sunil Kedar

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर वाढीव निधी देण्यात येईल. तसेच पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली असून कामावर होणारा विपरित परिणाम यापुढे होणार नाही. उस्मानाबादी व सानेन जातीच्या शेळींचे संवर्धन व विकास करण्यावर भर देण्यात येणार असून उस्मानाबादी शेळी पासून अधिक मास मिळते, तर सानेन शेळी अधिक दूध देते, त्यामुळे संगोपनासाठी शेतकऱ्यांना वाटपही करण्यात येणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान सांगितले.

Minister Sunil Kedar Visit Punyashlok Ahilyadevi Sheep-Goat Development Project At Dahivadi

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here