मुंबई – देशात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गरजू लोकांना दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशावेळी अनेक कलाकारांनी या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील सिद्धार्थ जाधव, संदीप पाठक, तेजस्विनी पंडीत, प्रिया बापट, प्रार्थना बेहरे या कलाकारांनी गरजू लोकांची मदत केली. आता मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी swapnil joshi देखील गरजूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे.(Actor swapnil joshi helps people during corona pandemic)

कोरोनामुळे सिनेक्षेत्रातील अनेक कामगारांचा रोजगार बंद झाला.त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नरोन्हा आणि स्वप्निल जोशी यांनी ‘मीडिया बझ’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत सिनेक्षेत्रात स्पॉटबॉयचे काम करणाऱ्यांना शंभरहून अधिक रेशन किटचे वाटप करण्यात आले आहे. मॉरिस नरोन्हा यांनी कोरोना काळामध्ये मुंबईमधील झोपडपट्टीमधील भागात गॅस सिलेंडर, रेशन आणि जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. कोरोना काळात गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन स्वप्निलने केले आहे. स्वप्निल आणि मॉरिसने नियोजन करून बोरिवली आणि दहिसर विभागातील झोपडपट्यांमध्ये गरजूंना रेशन कीटचे वाटप केले आहे.

Actor swapnil joshi helps people

Also Read: K2H2 च्या आठवणीत रमले काजोल-करण

मॉरिस आणि स्वप्निल यांनी कोरोना काळात केलेल्या या कार्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. याआधी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने लॉकडाउनमधे रेखाटलेल्या पेंटिग विकून गरजूंना मदत केली होती. सध्या महाराष्ट्रामध्ये चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण थांबले असून अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील कलाकार गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

Also Read: KGF स्टार यशचा दानशूरपणा, 3 हजार कर्मचाऱ्यांना मदतीचा हात

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here