नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजीच्या (Technology) बाबतीत लक्षणीय बदल झाले आहेत आणि हे आपण सर्वांनीच जवळून बघितले आहेत. आजच्या काळात आपली अनेक कामं अगदी सहजरित्या होत आहेत. याच प्रमुख कारण म्हणजे टेक्नॉलॉजी आणि विज्ञानात (Science and Technology) झालेली प्रगती. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का २०५० साली आपल्या पृथ्वीवर टेक्नॉलॉजीच्या (Earth in 2050) बाबतीत कोणते मोठे बदल होतील? २०५० साली कसं असेल आपलं जीवन? (Human Life in 2050) याबद्दल काही शास्त्रज्ञांनी आपलं मत व्यक्त केलंय. चला तर मग जाणून घेऊया पुढील ३० वर्षांमध्ये नक्की काय होणार. (know how evolution of technology takes place till 2050)

Also Read: तुमच्या एका क्लिकवर Google कसा शोधतो माहिती? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

२०५० पर्यंत जगात रोबोट्स (Robots) आणि कम्प्युटर्सचं अधिराज्य असेल यात शंका नाही. काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे,

२०५० पर्यंत जगभरात (World in 2050) आर्टिफिशिअल इंटेलिजेंटचा (Artificial Intelligence) बोलबाला राहील. याच्यामाध्यमातून कोणत्याच दुकानांमध्ये कॅशिअर्स दिसणार नाही त्याजागी ऑटो कॅशिअर्स राहतील. तसंच डॉग रोबोट्स आपल्या कुटुंबाचा भाग असतील.

रोबोट्स हे स्वयंपाकी, पोस्टमन, खेळाडू असतील आणि बरेच कामं सोपे करतील. फॅक्टरीमध्येही रोबोट्सच्या माध्यमातूनच काम होईल ज्यामुळे माणसांची मेहनत कमी होईल.

robots

जगभरात भाषांची सीमा नसणार व्हॉइस इंटेलिजंट टूल (Voice Intelligent Tool) येणार. यामुळे तुम्हाला जगातील कोणत्याही भाषेत आपलं म्हणणं मांडता येईल आणि शिक्षण घेता येईल.

तुमचे कपडे, डिव्हाइसेस आणि इतर दैनंदिन वापराच्या गोष्टींमध्ये सेंसर्सचं प्रमाण वाढणार आहे. यामुळे तुमच्या दैनंदिन हालचाली आणि तुमची प्रकृती तुम्हाला मॉनिटर करता येईल.

संगणकांमध्ये प्रगती होऊन Quantum Computers येणार. हे सर्व संगणक Quantum Physics च्या तंत्रज्ञानावर चालणार. याचा आकारही छोटा असेल. यामुळे फास्ट कॅल्क्युलेशन होऊ शकेल.

एलोन मस्क यांच्या न्यूरोलिंकप्रमाणे ज्या लोकांना मेंदूसंबंधी आजार आहे त्यांच्या मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप बसवली जाणार ज्यामुळे त्यांना मेंदूसंबंधित कुठलीच समस्या राहू नये. इतकंच नाहीतर अंध व्यक्तीनांही या चिपमुळे कुठल्याही प्रकारचा स्पर्श न करता संगणक हाताळता येऊ शकेल.

robots

२०५० साली आपण कदाचित काहीही न बोलता आपल्या मेंदूच्या सिग्नल्सच्या (Brain Signals communication) माध्यमातून गोष्टी हाताळू शकू. आपल्या विचारांनी गोष्टींना समोर मागे हलवू शकू. कदाचित आपलं ३० टक्के संभाषण मेंदूच्या सिग्नल्सच्या माध्यमातून असेल.

सर्वात महत्वाचा म्हणजे २०५० पर्यंत जगभरात व्हर्च्युअल रिऍलिटी (Virtual Reality) सर्वत्र असेल. याच्या मदतीनं तुम्ही घरी बसून मिटींग्स घेऊ शकाल मात्र मिटींग्सच्या ठिकाणी तुमचं शरीर व्हर्च्युअल रिऍलिटीच्या माध्यमातून सर्वांना दिसेल.

कदाचित अंध आणि बधिर लोकांच्या डोळ्यांमध्ये आणि कानामध्ये इलेक्ट्रॉनिक चिप बसवण्यात येईल ज्यामुळे त्यांना ऐकू येईल आणि दिसेलसुद्धा.

spaceships

Also Read: Windows लवकरच लाँच करणार ‘Next Generation’; लोगोही बदलणार?

२०५० पर्यंत जगभरात एकही पेट्रोल आणि डिझेल गाडी शिल्लक नसेल. त्यांची जागा नवीन इलेक्ट्रिक कार आणि बाईक्स घेतील. पेट्रोल पंप्सच्या जागी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स येतील.

२०५० मध्ये कार, ट्रक्स पूर्णपणे ऑटोमेटेड असतील. यात चालक नसेल इतकंच नाहीतर स्टिअरिंगसुद्धा नसेल.

२०५० पर्यंत कदाचित जगभरती १० लाखांपेक्षा अधिक लोक मंगळ ग्रहावर जाऊन कॉलनी तयार करून राहतील.

(know how evolution of technology takes place till 2050)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here