पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय (Alapan Bandopadhyay) यांनी केंद्र सरकारच्या नोटिसीला गुरुवारी उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली- पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय (Alapan Bandopadhyay) यांनी केंद्र सरकारच्या नोटिसीला गुरुवारी उत्तर दिलं आहे. एक अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली. केंद्र सरकारने अलपन बंडोपाध्याय (West Bengal chief secretary Alapan Bandyopadhyay ) यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत Disaster Management Act नोटिस पाठवली होती. नोटिसाला तीन दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. चक्रीवादळ यास संबंधातील केंद्राच्या बैठकीला 15 मिनिटे उशिरा रिपोर्ट केल्याने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. (West Bengal ex chief secretary Alapan Bandyopadhyay mamta banarjee notice answer)

सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार बंडोपाध्याय यांनी आपल्या उत्तरात सांगितलं की, ”मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या निर्देशानुसार चक्रीवादळ यासमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहण्यासाठी दीघा येथे गेले होते. त्यामुळे ते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. दीघा हे पूर्व मेदिनीपुर जिल्ह्यातील एक लोकप्रिय समु्री रिसॉर्ट आहे.” केंद्रीय गृहमंत्रालयाने 31 रोजी बंडोपाध्याय यांना नोटिस पाठवली होती. या अंतर्गत बंडोपाध्याय यांना 2 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

NARENDRA modi and mamta banarjee

बंडोपाध्यात 31 मे रोजी मुख्य सचिव म्हणून निवृत्त होणार होते. पण, कोरोना काळातील त्यांची जबाबदारी लक्षात घेता राज्य सरकारने त्यांची सेवा तीन महिन्यांसाठी वाढवली होती. याच काळात केंद्र सरकारने त्यांना दिल्लीमध्ये रिपोर्ट करण्यास सांगितलं होतं. पण, खरा वाद त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला उपस्थिती न लावल्याने निर्माण झाला. यासंदर्भात बंडोपाध्याय यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली होती. बंडोपाध्याय यांच्या कृतीमुळे IAS पद्धतीला तडा जाऊ शकतो आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असं अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

Also Read: सौदीचा मोठा निर्णय; मशिदीवरील लाउडस्पीकरला आवाजाची मर्यादा

पंतप्रधान मोदींची यास चक्रीवादळाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसोबत बैठक बोलावली होती. यावेळी पंतप्रधानांनी 15 मिनिटे मुख्य सचिवांच्या येण्याची वाट पाहिली. अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांना बैठकीसाठी येणार आहात काय, याबाबत विचारणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय बैठकीसाठी हजर झाले. पण, त्यांनी लगेच दुसऱ्या बैठकीचा हवाला देत तिथून पळ काढला, असं नोटिसमध्ये म्हणण्यात आलं होतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here