कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड, (karad) , पाटण (Patan) तालुक्यांतील 81 गावांत यंदाही महापुराच्या (Flood) संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविलेल्या नाहीत. दर वर्षी पाण्याखाली जाणारी गावे अन् तेवढीच शासकीय नोंद त्यांच्या दप्तरी आहे. त्यामुळे यंदाही त्या गावांवर पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. नदीकाठच्या पुनर्वसनासह (rehabilitation) काठावरील अतिक्रमणाचा विषयही सोपस्कर म्हणून बघू पाहणाऱ्या शासकीय मानसिकतेमुळे प्रश्न प्रलंबित राहात आहे. त्यामुळे तोही विषय पावसाळ्यासारखाच झाला आहे. पावसाळा आला, की पुनर्वसन, अतिक्रमणाचा विषय चर्चेत येतो. नेत्यांमधून चर्चा रंगवली जाते. अशाच पद्धतीने तब्बल 16 वर्षे उपायायोजनांची कागदोपत्री घोडेच केवळ नाचवले जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड, पाटणमध्ये पुरापासूनच्या संरक्षणाचे उपाय शून्यच दिसताहेत. (satara-marathi-news-koyna-krishna-river-flood-situation-to-be-control-karad)
कऱ्हाड व पाटण तालुक्यांत कोयना व कृष्णा नदीच्या पुरात बाधित होणाऱ्यांची संख्या दर वर्षी वाढते आहे. 2005, 2006 मधील महापुराच्या हाहाकारनंतर सरकार जाग येणे अपेक्षित होते. मात्र, 16 वर्षांनंतरही त्या धोकादायक गावात एकही उपाययोजना राबवलेली नाही. कऱ्हाडला 31 हून अधिक, तर पाटणला 50 गावे दर वर्षी महापुरात बाधित ठरत आहेत. ती यंदाही बाधित होणारच आहेत. मात्र, सोपस्करासाठी काठावरील घरांच्या पुनर्वसनासह महापुरापासूनच्या संरक्षणाची चर्चा रंगवली जाईल. त्यासाठी बैठका घेतल्या जातील, निर्णय जाहीर करण्याचा सोपस्कर केले जातील, मात्र, अंमलबजावणी शून्यच असणार आहे. पुरात अडकणाऱ्या गावांना संरक्षक भिंती बांधण्याच्या घोषणाही पोकळ ठरल्या आहेत. ज्या वर्षी पूर नाही, त्या वर्षी त्या विषयाची चर्चाच नाही, अशी शासकीय मानसिकता मारक ठरत आहे.
Also Read: शिक्षकांसाठी जिल्हाधिका-यांनी दिला आदेश; तातडीने कार्यवाही करा
दर वर्षी कऱ्हाड, पाटण तालुक्यांत नदीला येणारा पूर, अतिवृष्टीचा अंदाज घेऊन संरक्षणाच्या उपायांचा विचार होताना दिसत नाही. त्यामुळे दर वर्षी महापुराशी सामना ठरलेलाच असतो. कऱ्हाडला गावनिहाय संरक्षण भिंती, तर पाटणला पूररेषेतील घरांचे पुनर्वसनाच्या भीमगर्जना शासकीय कागदावरील शाई रंगविण्यापुरत्याच जाहीर झाल्याचे स्पष्ट आहे.

Also Read: ओढ्यावरील अतिक्रमणाचा खासदार पाटलांना फटका; बंगल्यात शिरलं पावसाचं पाणी
अशा झाल्या केवळ घोषणाच…
सन 2005 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी कऱ्हाडला नदीकाठावरील गावांना संरक्षण भिंती बांधून देण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात कहीच झाले नाही.
भाजप- शिवसेनेच्या काळातही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कऱ्हाड तालुक्यातील गावांत संरक्षक भिंतीचे आश्वासन दिले होते, तेही हवेतच विरले.
पाटण तालुक्यातील नदीकाठच्या घरांच्या पुनर्वसनाची भीमगर्जना झाली होती. मात्र, त्याबाबतही काहीच हालचाली झाल्या नाहीत.
कऱ्हाड शहराला संरक्षक भितींच्या कामावरून केवळ राजकारण झाल्याने संरक्षक भिंतीचे काम आजअखेर रखडलेले आहे. संरक्षक भिंतही अर्धवटच झाली आहे.
Esakal