अमेरिका कोरोना विषाणूप्रकरणी चीनविरोधात आक्रमक झाली आहे. अमेरिकीचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी चीनवर अनेक निर्बंध लागू केले आहेत.

वॉशिंग्टन- अमेरिका कोरोना विषाणूप्रकरणी चीनविरोधात आक्रमक झाली आहे. अमेरिकीचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी चीनवर अनेक निर्बंध लागू केले आहेत. शिवाय कोरोना विषाणूचा उगम चीनच्या वुहान लॅबमध्येच झालाय का? याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलाय. त्यातच माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता सर्वांना, माझ्या शत्रूंनासुद्धा पटतंय की मी चीनबाबत योग्य होतो. विषाणूचा उगम वुहान लॅबमधूनच झाला हे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, असं ट्रम्प म्हणाले आहेत. (China should pay 10 trillion dollars to US world for death destruction they caused former US President Trump)

आता सर्वांना पटलं असले. ज्यो बायडेन सुद्धा माझ्याच मार्गावर पुढे जात आहेत. मी असतो तर आणखी कठोर निर्णय घेतले असते. चीनच कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे चीनने अमेरिका आणि जगाला 10 ट्रिलियन डॉलर नुकसान भरपाई म्हणून द्यावेत. चिनी विषाणूमुळे जगात अनेक मृत्यू आणि मोठं नुकसान झालं आहे, असं ट्रम्प म्हणाले आहेत. चीनच्या वुहान शहरात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा विषाणू जगभरात पसरला होता.

us china

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय की, त्यांच्या निर्णयामुळे हजारो लोकांचा जीव वाचला आहे. तत्काळ अमेरिकीच्या सीमा बंद करण्याचा आणि लस निर्मितीचा निर्णय महत्त्वाचा ठरला. विरोधक माझ्यावर सीमा बंद केल्याबद्दल टीका करत होते. डेमोक्रॅटकडून फेक न्यूज पसरवल्या जात होत्या. पण, मी घेतलेले निर्णय अनेकांचे जीव वाचवणारे ठरले. मी यूरोपीय देशांना आपल्या सीमा बंद केल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवण्यास मदत झाली.

Also Read: सौदीचा मोठा निर्णय; मशिदीवरील लाउडस्पीकरला आवाजाची मर्यादा

बायडेन सरकार चीनविरोधात आक्रमक

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी चीनच्या काही कंपन्यांना काळ्या यादीत टाकलं आहे. चीनच्या 31 कंपन्या चायनिज लष्कराला आर्थिक मदत करत आहे. यामुळे या कंपन्यांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुद्दावर चीनने ओरड केली आहे. हे कंपन्यांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे चीनने म्हटलंय. दुसरीकडे, वुहान लॅबमध्येच विषाणूचा उगम झाल्याचा दावा अनेक रिपोर्टमधून करण्यात येत आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकेमध्ये वादाची स्थिती आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here