बीड : जिल्ह्याला (Beed) मोठा तडाखा दिलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या (Corona Virus Infection) दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असून गुरुवारी (ता. तीन) जिल्ह्यात केवळ ३२२ रुग्ण आढळले. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाणही घटले असून मृत्यूंची संख्याही घटली आहे. मात्र, याचवेळी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची आणि या आजारामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे. बुधवारी (ता. दोन) तपासणीसाठी घेतलेल्या ३३१० लोकांच्या स्वॅब नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल गुरुवारी हाती आले. यामध्ये ३२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, २९८८ लोकांचे नमुने निगेटिव्ह आढळले. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ९.७ टक्के होते. मागच्या २४ तासांत सात मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत जिल्ह्यातील २०२२ लोकांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ८७६२९ झाली. गुरुवारी ६४८ रुग्णांनी कोरोनावर (Corona) मात केली. आतापर्यंत ८०८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात ४९४५ सक्रिय रुग्ण असून यातील ९४० गृहविलगीकरणात आहेत. तर, १४३ रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत आहेत. सध्या ३८६२ रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. (Corona Patient Numbers Decline, Mucormycosis Increases In Beed)

Also Read: औरंगाबादेत कारमध्येच लसीकरण, सोमवारपासून होणार सुरुवात

corona free

म्युकरमायकोसिसचे १२८ रुग्ण

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अंबाजोगाईच्या (Ambajogai) स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात (Swami Ramanand Thirth Medical College) या रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत १२८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८८ रुग्णांवर उपचार सुरु असून १७ रुग्ण बरे झाले आहेत. या १२८ पैकी १२७ रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे. तर, ५० रुग्णांना मधुमेह आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here