नवी दिल्ली- मान्सून (monsoon ) गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला आहे. चार महिने भारतावर बरसणाऱ्या मान्सूनचा सर्व देश आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वसाधारण 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. केरळनंतर मान्सून 15 जूलैपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो. हवामान विभागाने (IMD) सांगितलं होतं की, दक्षिण-पश्चिम वाऱ्यांमुळे केरळमध्ये पाऊस पडत राहील. पण, 3 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकेल. (Is There Anything To Worry About Monsoon Has Been Delayed)
हवामान विभागाने याआधी असा अंदाज लावला होता की, 31 मेपर्यंत मान्सून भारताच्या मुख्य भूमिपर्यंत पोहोचेल. 21 मे रोजी मान्सून अंदमान सागरात धडकलं होतं. त्यानंतर 26 मे रोजी ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये आलेल्या यास चक्रिवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला. मान्सून आगमनाचा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. भारतात जवळपास 70 टक्के पाऊस हा मान्सूनमुळे पडतो.

विशिष्ट भौगोलिक भागावर पडलेला पाऊस, त्याची तीव्रता आणि वाऱ्याची गती लक्षात घेत हवामानशास्त्रज्ञ मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर करतात. केरळ आणि लक्षद्वीपमधील 14 स्टेशनवर 10 मेनंतर सलग दोन दिवस 2.5 एमएम पाऊस पडल्यास ही मान्सूनची चाहूल मानली जाते. मान्सूनच्या अनुमानासाठी वारा आणि तापमानही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
मान्सूनचे आगमन उशिरा होणे चिंतेचा विषय आहे का?
नाही. मान्सूनचे आगमन उशीरा होणे चिंतेचा विषय नाही. मागीलवर्षी मान्सून 1 जूनला केरळमध्ये आला होता. 2019 मध्ये हवामान विभागाने माम्सूनचे आगमन 6 दिवस उशीराने होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण, मान्सून केरळमध्ये 8 जूनला धडकला. 2017 आणि 2018 मध्ये मान्सूनचे आगमन लवकर झाले होते.
Also Read: कोडं उलगडलं; झारखंडमध्ये दिसलेली ती आकृती एलियनची होती का?
कमी पावसाचे संकेत?
मान्सूनचे वेळेवर आगमन झाले नाही, म्हणजे पाऊस कमी पडतो अशातली गोष्ट नाही. मान्सून काही दिवस लवकर किंवा उशिराने येऊ शकतो. त्यामुळे मान्सून उशिरा आल्याचा काही प्रभाव पडणार नाही. पण, मान्सून उशिराने दाखल झाला असल्यास तो भारतातील इतर भागात पोहोचण्यास उशीर करु शकतो.
Esakal