साडीत दिसायचंय खास…तर बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे वेअर करा ब्रालेट ब्लाऊज…चला पाहुयात ब्रालेट ब्लाऊजची काही डिझाईन्स..लूज अर्थात सैलसर पदर साडीचा काढायचा असेल तर त्यासाठी शिफॉन, जॉर्जेट, शिफॉन सिल्क अशा फॅब्रिकच्या साड्या अथवा हलक्या वजनाच्या साड्यांचा उपयोग करा. तुम्ही त्यासह स्ट्रेप ब्लाऊज, टर्टल नेक ब्लाऊज आणि ब्रालेट ब्लाऊज वापरू शकता साडीसह मॅच करणारा बेल्ट साडी लुक तुम्ही करू शकता. यासह तुम्ही हेव्ही हार्ट शेप ब्लाऊज अथवा हेव्ही डिझाईनर ब्लाऊज घालून साडीचा लुक अधिक चांगला करू शकता. तुम्हाला जर अशी साडी नेसायची असेल तर तुम्ही तुमच्या साडी नेसण्याची पद्धत बदलून वेगळा लुक देऊ शकता. ब्रालेट ब्लाऊज आणि साडी नेसण्याचा हा अंदाज एकदम स्टायलिश आहे. तुम्हीही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना हा लुक ट्राय करू शकता. ही स्टाईल बारीक मुलींना अधिक शोभून दिसते. ब्रालेट ब्लाऊज घातल्यावर तुम्ही साडी नेसताना नॉन पार्टी लुक साडीचा पर्याय निवडा. चुकूनही ही स्टाईल सिल्क अथवा कॉटन साडीवर करू नका. यासााठी तुम्ही शिफॉन अथवा जॉर्जेट साडीची निवड करा. हा लुक या साड्यांवर अधिक खुलून दिसतो