देशाचा परकीय चलन साठा नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व बँकचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी नव्या आर्थिक धोरणाची घोषणा केली.

नवी दिल्ली– देशाचा परकीय चलन साठा नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व बँकचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी नव्या आर्थिक धोरणाची घोषणा केली. शुक्रवारपर्यंत देशाचा परकीय चलन साठा 598.2 अब्ज डॉलरच्या रिकॉर्डवर पोहोचला आहे. याचे अधिकृत आकडे लवकरच जाहीर केले जाणार आहेत. शक्तिकांत दास म्हणाले की, या आठवड्यात जे संकेत मिळाले आहेत, त्यानुसार देशाचा परकीय चलन साठा 600 अब्ज डॉलरचा आकडा पार करेल. पण, याचे अधिकृत आकडे शुक्रवारी जाहीर होतील. (RBI shaktikanta das said foreign reserve cross 600 billion)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाचा परकीय चलन साठा दुप्पट झाला आहे. 2014 पर्यंत देशाचा परकीय चलन साठा 312.38 अब्ज डॉलर होते, तो वाढून 600 अब्ज डॉलरपर्यंत गेला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 2 वर्षांच्या काळात परकीय चलन साठा 179 अब्ज डॉलरने वाढला आहे. 2019 च्या शेवटापर्यंत परकीय चलन साठा 421.86 अब्ज डॉलर होता.

Shaktikant-Das

सुवर्ण साठा आणि परकीय चलन मालमत्तेत वाढ झाल्याने चलन साठा वाढला आहे. दास यांनी शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या द्विमासिक आर्थिक धोरणाच्या नीतीची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, भारताचा परकीय चलन साठा 600 अब्ज डॉलरचा आकडा पार करेल. अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहावा यासाठी रिझर्व्ह बँकेकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यांतर्गत कोरोनाने प्रभावित अनेक क्षेत्रांना आर्थिक मदत केली जात आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली असून रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली. एप्रिलमध्येही पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. तेव्हा रेपो रेट 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के असाच ठेवला होता. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here