अभिनेत्री सायली संजीव sayali sanjeev हे मराठी मालिका आणि चित्रपटविश्वातील सुपरिचित नाव. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सायलीचा मोठा चाहतावर्ग आहे. सायली सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच तिने विनोदसम्राट अशोक सराफ Ashok Saraf यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केला आहे. अशोक सराफ यांच्यासोबतचा तिचा हा फोटो असून त्यावर तिने ‘हॅपी बर्थडे पप्पा’ असं लिहिलंय. सायलीने याआधीही अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले, तेव्हाही कॅप्शनमध्ये त्यांचा उल्लेख ‘पप्पा’ असाच केला. अशोक सराफ यांना ती पप्पा का म्हणते, याचा खुलासा खुद्द तिनेच एका मुलाखतीत केला होता. (this is why actress sayali sanjeev calls ashok saraf as papa)
एका रेडिओ चॅनलच्या मुलाखतीदरम्यान चाहत्याने सायलीला यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. ‘तुम्ही अशोक सराफ आणि निवेदिता यांची मुलगी आहात का’, असा प्रश्न विचारला असता, त्यावर सायली म्हणाली, ‘तुम्ही असं समजू शकता. माझी काहीच हरकत नाही. मला याआधीही अनेकांनी हा प्रश्न विचारला होता. परंतु माझ्या वडिलांचं नाव संजीव चंद्रशेखर आणि आईचं नाव शुभांगी चंद्रशेखर आहे.’ अनेकदा लोकांचा गैरसमज का होतो, यावर उत्तर देत ती पुढे म्हणाली, ‘अशोक सराफ आणि निवेदिता यांना मुलगी नाही. त्यामुळे त्यांनी मला नेहमीच त्यांच्या मुलीसारखं वागवलं आहे. म्हणूनच मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते.’
Also Read: लग्नाबद्दल सायली संजीव म्हणते..

Also Read: ‘बबड्या’चा तेजश्री प्रधानला खास सल्ला; ‘भूतकाळ विसर कारण..’
सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून कलाविश्वात पाऊल ठेवलं. यामध्ये तिने साकारलेल्या गौरीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून फार प्रेम मिळालं. या मालिकेतील तिचं अभिनय पाहून पुढे तिला चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले. सायली सध्या ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत अभिनेता सुयश टिळकसोबत मुख्य भूमिका साकारत आहे.
Esakal