वाशीम ः अन्याय व अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी पोलिसांची (Police) मदत घेतली जाते. खाकीच्या धाकाने गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत नाहीत. मात्र, वाशीम पोलिस (Washim Police) दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर परजिल्ह्यात नियुक्तीवर असलेल्ये एका पोलिस निरीक्षकानेच बळजबरी अत्याचार करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून वाशीम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव विश्वकांत गुट्टे आहे. सध्या तो नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर (Ardhapur In Nanded) पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. (Washim: Police inspector forcibly tortures female police constable)

स्थानिक गुन्हे शाखा वाशीम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी यांच्यावर बलात्कार करून मारहाण केल्याप्रकरणी वाशीम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक असून, त्यांच्यावर ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास वाशीम शहर पोलिस करीत आहेत.
Also Read: भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे “दादा “?
दरम्यान पोलिस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांत एकचं खळबळ उडाली आहे. वाशीमच्या मालेगाव पोलिस ठाण्यात २००७ मध्ये विश्वकांत गुट्टे पीएसआय या पदावर कार्यरत असताना सदर महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी वाशीममध्ये आरोपी घरी आला असता त्यांनी जबरदस्ती करीत बलात्कार केला आहे. त्याप्रकरणी काल रात्री महिला पोलिस कर्मचारी यांनी वाशीम शहर पोलिसांत ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करीत असल्याचे पोलिस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले.
Also Read: होमिओपॅथिक गोळ्यांमधील औषधी घटक तपासले जाणार

सखोल तपासानंतर अटक
या प्रकरणातील आरोपी पोलिस निरीक्षक हा मालेगाव येथे कार्यरत होता. या कार्यकाळातच फिर्यादीची त्याच्यासोबत ओळख झाल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वकांत गुट्टे यांचा फोन लागत नव्हता. या प्रकरणात सखोल तपास करून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी प्रतिक्रीया ठाणेदार ध्रुवास बावनकर यांनी दिली आहे. या घटनेने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
संपादन – विवेक मेतकर
Washim: Police inspector forcibly tortures female police constable
Esakal