कऱ्हाड (सातारा) : जिल्ह्यातून परदेशात (Foreign) उच्च शिक्षणासह नोकरी, औषधोपचार अशा महत्त्वाच्या कारणांसाठी जाणाऱ्यांना वॉक इन लसीकरणाची सुविधा प्राधान्याने देण्यात यावी, अशी सूचना खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांना केली आहे. (MP Shrinivas Patil Gave Instruction To Collector Shekhar Singh To Vaccinate Those who Goes To Foreign)

परदेशात जाताना विश्व स्वास्थ्य संस्थेने मान्यता दिलेल्या लशीच ग्राह्य धरल्या जातात. बहुतांशी मुलांनी उच्च शिक्षणासाठी परदेशीस्थित विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.

जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह दुर्धर आजारावरील औषध (Medicine) उपचारासाठी अथवा नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्या येथील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांकडून होत आहे. त्याबाबत खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी सिंह यांना पत्र (Letter) लिहून सूचना केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे, की परदेशात जाताना विश्व स्वास्थ्य संस्थेने (World Health Organization) मान्यता दिलेल्या लशीच ग्राह्य धरल्या जातात. बहुतांशी मुलांनी उच्च शिक्षणासाठी (Higher Education) परदेशीस्थित विद्यापीठात (University) प्रवेश घेतला आहे. त्यासाठी त्यांना सप्टेंबर महिन्यात परदेशी शिक्षणासाठी जायचे आहे.

Also Read: चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं नागरिकांना आवाहन

Vaccination

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये. काही तरुण मुले नोकरीसाठी परदेशी जाणार आहेत, तसेच काही नागरिकही औषधोपचार करण्यासाठी परदेशात जाऊ इच्छितात. त्या समस्येचा विचार करून जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरी व औषधोपचारास जाणाऱ्या 45 वर्षांच्या आतील नागरिकांसाठी अत्यावश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास लसीकरण केंद्रावर वॉक इन पद्धतीने लसीकरणाची व्यवस्था करून लस देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

MP Shrinivas Patil Gave Instruction To Collector Shekhar Singh To Vaccinate Those who Goes To Foreign

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here