ढेबेवाडी (सातारा) : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यात माझ्यासह राज्यातील अन्य कुटुंबांनी घरातील कर्ता माणूस गमावला आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. मराठ्यांच्या भावना समजावून घ्या, राजकारण बाजूला ठेऊन आरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करा, अशी भावनिक साद अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी राज्यातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे घातली आहे. (Narendra Patil Promised To Bring MP Udayanraje Bhosale And MP Sambhajiraje Chhatrapati Together For Maratha Reservation Fight)

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गायकवाड समितीच्या माध्यमातून आरक्षण जाहीर केले होते.

मराठा आरक्षणाबाबत जागृती करण्यासाठी श्री. पाटील यांचे राज्यातील विविध जिल्ह्यांत दौरे सुरू आहेत. यासंदर्भात लोकसभा-राज्यसभेचे खासदार तसेच विधासभा व विधान परिषदेचे आमदार यांना त्यांनी नुकतीच वैयक्तिक पत्रे पाठवून आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. माझे वडील (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षणासाठी लढा उभारत बलिदान दिले होते. त्यानंतर कोपर्डी येथील घटनेनंतर मराठा समाज पुन्हा एकदा एकवटला.

Also Read: उदयनराजे, संभाजीराजे,शिवेंद्रराजेंचे नेतृत्व मान्य केले जाईल ?

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गायकवाड समितीच्या माध्यमातून आरक्षण जाहीर केले. मराठा समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षा व “सारथी’च्या माध्यमातून खूप फायदा झाला. मात्र, अलीकडे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजासमोर अडचणी वाढल्या आहेत. आपणही ज्या पक्षात आहात त्या पक्षाकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे व प्रत्यक्ष विनंती करावी. कायदेशीर बाजू भक्कम करून आरक्षण लढाई यशस्वी करण्यास साथ द्यावी, असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.

Also Read: मराठा आरक्षण प्रश्नी तात्काळ अधिवेशन बोलवा; संभाजीराजें पाठाेपाठ पाटील आक्रमक

maratha reservation

उदयनराजे व संभाजीराजेंना एकत्र आणणार

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) व खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनायक मेटे आदी नेतेमंडळींनी एका प्लॅटफॉर्मवर यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे नरेंद्र पाटील यांनी आज सांगितले. ते म्हणाले,””खासदार उदयनराजे भोसले यांची एन्ट्री नेहमीच जबरदस्त असते. एकदा निर्णय घेतला की त्याचा निर्णय लागेपर्यंत ते मागे हटत नाहीत. त्या सर्वांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही त्यावेळी प्रयत्न केले आणि आताही करत आहोत.”

Narendra Patil Promised To Bring MP Udayanraje Bhosale And MP Sambhajiraje Chhatrapati Together For Maratha Reservation Fight

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here