French Open 2021 : महिला टेनिस क्रमवारीतील सातव्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने (Serena Williams) यंदाच्या वर्षी विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दिलाय. तिसऱ्या फेरीतील लढतीत तिने आपल्याच देशाच्या डॅनियल कॉलिन्स हिला 6-4, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. सेरेनाला टक्कर देण्याची क्षमता असलेली महिला जगातील अव्वल क्रमांकावरील अँश्ले बार्टी, नाओमी ओसाका, सिमोना हालेप आणि आर्यना सबालेंका या चौघी यापूर्वी स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे सेरेनाला विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. तिसऱ्या फेरीतील विजय सेरेनासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. याचे कारण 2018 पासून पहिल्यांदाच ती फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत पोहचलीये. (French Open 2021 Serena Williams reach last 16 first time since 2018)
Also Read: IPL आधी UAE त रंगणार पाकमधील स्पर्धा; वेळापत्रकही ठरलं!
सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियन 24 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या असणाऱ्या दिग्गज महिला टेनिस स्टार मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. विजयानंतर सेरेना म्हणाली की, सध्याच्या घडीला इतक्या दूरचा विचार करत नाही. रेकॉर्डपेक्षा खेळावर फोकस रहावा यासाठी प्रयत्नशील आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळण्याचा आनंद घेत आहे, असे तिने चौथ्या फेरीत प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे. 39 वर्षीय सेरेनाने तीनवेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. चौथ्या फेरीत तिची लढत जागतिक टेनिस क्रमावरीत 21 व्या स्थानावर असलेल्या कझाकिस्तानच्या ऐलेना रयबकिना हिच्या विरुद्ध होणार आहे.

Also Read: WTC Final: ब्रेट लीची ‘बोलंदाजी’ विराट सेनेला टेन्शन देणारी
महिला एकेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात महिला टेनिस जगतात ऐकेकाळी अव्वलस्थानी पोहचलेल्या बेलारूसच्या विक्टोरिया अजारेंकाने चौथी फेरी गाठली आहे. तिने अमेरिकेच्या मेडिसन कीज हिचा 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 2013 नंतर पहिल्यांदा ती फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत पोहचली आहे.

रशियाच्या डॅनिल मेदवेदेव चौथ्या फेरीत
पुरुष एकेरीत टेनिस जगतातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याने देखील चौथ्या फेरीत प्रवेश केलाय. त्याने 32 व्या मानांकित अमेरिकन रिली ओपेल्का याला 6-4, 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. क्ले कोर्टवरील मागील मागील चार लढतीत एकही सामना न जिंकणाऱ्या मेदवेदेवने पहिल्या सेटमध्ये ओपेल्काची सर्विस दोनवेळा ब्रेक करत त्याला चुका करायला भाग पाडले. त्यानंतर त्याने अमेरिकन खेळाडूला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. चौथ्या फेरीत त्याच्यासमोर 22 क्रमांकावर असलेल्या चिलियन टेनिस स्टार क्रिस्टियन गारिनचे आव्हान असणार आहे. पुरुष एकेरीतील आणखी एका सामन्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने सर्बियाच्या लास्लो जेरेला 6-2,7-5,6-2 असे पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला.
Esakal