जळगाव ः गेल्या वर्षभरापासून कोरोना (Corona) महामारीच्या संकटामुळे वृक्षारोपण मोहीम (Plantation campaign)थंडावली होती. असे असले तरी यंदा मात्र सामाजिक वनीकरण विभाग (Department of Social Forestry) , जळगाव व यावल वन विभागातर्फे ( Jalgaon, Yaval Forest Department) यंदा १२ लाख वृक्ष लावण्याचे नियोजन असल्याची माहिती सामाजिक वन विभागाचे विभागीय वनाधिकारी डॉ. सैफुन शेख यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) दिली.

( jalgaon district twelve lakh trees will be planted )

Also Read: गावासाठी तिने विकले सौभाग्याचे लेणे; अन्‌ भरला महावितरणचा दंड

सामाजिक वनीकरण विभागातर्फे यंदा शंभर ठिकाणी वृक्षारोपणासाठी रोपे तयार केली जात आहेत. एके ठिकाणी १८ हजार रोपे तयार केली जातात. असे शंभर ठिकाणी रोपे तयार करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. अशी साडेपाच लाखांवर रोपे लावली जातील, तर जळगाव, यावल वन विभागातर्फे सात ते आठ लाख रोपे तयार करून लावली जातील. वर्षभरात सुमारे १२ ते १३ लाख रोपे लावण्याचे नियोजन आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डिकसाई गावाजवळील एका गावात वृक्षोरापण केले जाणार आहे. सोबतच लांडोरखोरी उद्यानात वृक्षारोपण होणार आहे. यात लिंब, चिंच, वड, पिंपळ, शेवगा, सरस, करंज, गुलमोहर, सीताफळ, चिकू, गावठी आंबा आदी वृक्षांचा समावेश आहे.

Plantation

Also Read: अकरा तालुक्यांत नवे रुग्ण दहाच्या आत

ओरिजिनल ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित

ग्लोबल वॉर्मिंगच्या फटक्यामुळे केव्हाही पाऊस, केव्हाही अचानक ऊन, वादळे अशी संकटे पृथ्वीवर येत आहेत. यामुळे पर्यावरणमी पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा नारा देत वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतात. वृक्ष टिकले तर पाऊस पडेल व पावसाअभावी निर्माण होणारी सर्वच संकटे टळतील. कोरोना महामारीत ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच पटले असेल. कृत्रिम ऑक्सिजनसाठी होणारी मारामार पाहता झाडांपासून निर्माण होणारा व आपल्याला मुक्त मिळणारा ऑक्सिजन किती महत्त्वपूर्ण आहे याची प्रत्येकाला जाणीव झाली असेल. यामुळे प्रत्येकाने वृक्ष लावणे, त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here