नवी दिल्ली – मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर अकाउंट अनव्हेरिफाइड केलं आहे. उपराष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. उपराष्ट्रपतींच्या ट्विटरची ब्लू टिक हटवल्याचं निदर्शनास आल्यानंतर अनेकांनी राग व्यक्त केला आहे. भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक का हटवली असा प्रश्न उपस्थित करताना हा भारताच्या संविधानावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अनेक युजर्सनी अकाउंट अॅक्टिव्ह नसल्याने अनव्हेरिफाइड करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

Also Read: डोनाल्ड ट्रम्प यांना 2023 पर्यंत फेसबुकवर ‘नो एन्ट्री’

ट्विटरच्या अटी आणि नियमांनुसार जर कोणी हँडलचं नाव बदललं तर ब्लू टिक हटवली जाते. तसंच एखादं अकाउंट सक्रिय नसेल, अपडेट नसेल्यास अनव्हेरिफाइड केलं जातं. तसंच ज्या कारणासाठी अकाउंट व्हेरिफाय केलं होतं ते राहिलं नसेल तर अकाउंट अनव्हेरिफाइड करण्यात येतं. समजा एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण करत नसल्यास ब्लू टिक हटवली जाते.

सरकारच्या नव्या गाइडलाइनवरून ट्विटर आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. नव्या गाइडलाइन लागू करण्याबाबत ट्विटरने अद्याप काही सकारात्नमक अशी भूमिका मांडलेली नाही. कंटेंट फिल्टरिंगवरून दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील कार्यालयावर छापा टाकला होता.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here