अभिनेत्री यामी गौतमने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत शुक्रवारी चाहत्यांना सुखद धक्का दिला.
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी तिने गुपचूप लग्न उरकलं आहे. या लग्नाचे आणखी काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंडप, फोटोग्राफर्स आणि कुटुंबीय अशी सर्व तयारी या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय. आदित्यच्या ‘उरी’ चित्रपटात यामीनेसुद्धा भूमिका साकारली होती. चित्रपटात ती इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत होती. यामी आणि आदित्यने हे लग्न नेमकं कुठे केलं, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सध्या या दोघांवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामीने ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘काबिल’, ‘बाला’ आणि ‘गिन्नी वेड्स सनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.