कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लसीकरण मोहिमेला वेग

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) आणि त्यात मागील वर्षभरापासून सुरू असलेले निर्बंध (Lockdown Restriction) यामुळे असंघटित क्षेत्रातील महिला कामगार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे देशातील सर्व कामगार (Daily wages Workers), कष्टकरी नागरिकांना कोरोनाची लस ही रेशकर्डवर (Ration Card) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय महिला फेडरेशनने केली आहे. (National Federation of Indian Women demands Corona Vaccination should be allowed on Ration Card)

Also Read: मनसुख हिरेनला विष देण्यात आलं होतं का? तपासात सत्य उघड

फेडरेशनच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. रेशनवर लस दिल्याने त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळेल, तसेच यासोबत डाळी, तेल, साखर, कडधान्य हे सुद्धा रेशनवर देऊन सध्या संकटात सापडलेल्या कष्टकरी, कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी संघटनेच्या सुनीता कुलकर्णी, निर्मला पवार, प्रभा राठोड, दीपा कदम, पुष्पा तापोळे आणि हर्षा पवार यांनी केली.

Also Read: आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले; सह्याद्री गेस्ट हाऊसवरील घटना

भारतीय महिला फेडरेशनची स्थापना ही 4 जून 1954 रोजी झाली होती. या संघटनेत अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी, शांता रानडे आदींनी मोठे योगदान दिलेले आहे. 67 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबई ठाण्यातील घरकामगार महिलांना रेशन किट वाटप करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या निर्मला पवार यांनी दिली.

Also Read: मुंबई पालिकेकडून लसीकरणाची सर्व ग्लोबल टेंडर्स रद्द

यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्याचा निषेध करत हे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.तसेच राज्यात घरकामगार महिलांची तातडीने नोंदणी सुरू करावी, त्यांना महिना 10हजार पेन्शन द्यावे, राज्यातील सर्व मुलींना पदवी शिक्षण मोफत द्यावे, महिलांना विधानसभेत आणि संसदेत 33 टक्के आरक्षण आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here