नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी केली आहे. या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून दुसरी लाट ओसरली आहे, असं म्हणता येण्यासारखी परिस्थीती अजूनही नाहीये. मात्र, रुग्णसंख्या घटताना दिसून येत आहे. या दुसऱ्या लाटेत एक टप्पा असा होता जेंव्हा तब्बल चार लाखांच्या पार दैनंदिन रुग्णसंख्या आढळत होती. काही दिवस दररोज आढळणारी ही रुग्णसंख्या तीन लाखांच्या पार स्थिरावली देखील होती. मात्र, आता ही संख्या एक लाखाच्या वर आणि दिड लाखांच्या आत आली आहे. भारतात काल कोरोनाचे 1 लाख 32 हजार 364 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र, आजच्या नव्या रुग्णांची संख्या ही कालच्या संख्येहून कमी आहे.

Corona Virus

Also Read: मराठीसह 10 प्रादेशिक भाषांमध्ये CoWIN पोर्टल

भारतात गेल्या 24 तासांत 1,20,529 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह भारतातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 2,86,94,879 वर पोहोचली आहे. भारतात काल दिवसभरात 1,97,894 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 2,67,95,549 वर पोहोचली आहे. काल देशात 3,380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 3,44,082 वर पोहोचली आहे. सध्या भारतात 15,55,248 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत भारतात एकूण 22,78,60,317 जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 20,84,421 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 36,11,74,142 वर पोहोचली आहे.

भारतातील आजवरचे एकूण रुग्ण : 2,86,94,879

एकूण बरे झालेले रुग्ण : 2,67,95,549

एकूण कोरोना मृत्यू : 3,44,082

ऍक्टीव्ह रुग्णसंख्या : 15,55,248

एकूण लसीकरण : 22,78,60,317

कोविन ऍप आता मराठीतून

लसीकरण सुरु झाल्यापासून कोविन CoWIN अॅप चर्चेत आलं आहे. पण फक्त इंग्रजी भाषा असल्यामुळे अनेकांना या अॅपचा वापर करता येत नव्हता. सरकारनं सर्वसामान्यांची अडचण पाहून प्रादेशिक भाषेतही या अॅप उपलब्ध करुन दिलं आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यासंदर्भात घोषणा केली असून, कोविन अॅप मराठी, हिंदीसह अन्य 10 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. शुक्रवारापासून ही सुविधा सुरु झाली आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here