संतोष गिरडे
शिरपूर जैन (जि.वाशीम) ः सध्या कोरोनाने ऑक्सिजनची चणचण समोर येत असताना ऑक्सिजनचा मुळ वृक्षारोपण, संगोपन, संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज झाली असून, ग्लोबल वार्मिंगचा धोका त्यामुळे टाळता येऊ शकतो. वृक्ष लागवडीने वनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शासन अभियान राबवित असले तरी, जोपर्यंत वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ होत नाही तो पर्यंत हे अभियान यशस्वी होणार नाही. शासन सांगते म्हणून आपण हे करणे त्यापेक्षा वृक्ष नसेल तर त्याचे किती वाईट परिणाम होतील हे प्रत्येकाला पटवून त्याचे रूपांतर लोकचळवळीत झाले तर फार महत्त्वाचे कार्य पार पडेल. (Plantation in the rainy season for oxygen growth at Washim)

Also Read: भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे “दादा “?

पूर्वी घनदाट जंगले होती, सूर्याची किरणे सुद्धा जमिनीवर पोहोचत नसत. मानवाने आपल्या हव्यासापोटी काय केले. प्रथम निवाऱ्यासाठी नंतर सरपणासाठी व नंतर आपल्या स्वार्थासाठी हळू जंगले उजाड केली. त्यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडला आणि पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. जळतानासाठी किंवा घरे बांधण्यासाठी बेशुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली पावसाचे प्रमाण कमी झाले. जमिनीची धूप होऊन नापिकी झाली, दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही संकल्पना राबवली जात आहे. प्रत्येक वर्षी वृक्षारोपण केले जाते. वृक्षांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार लाखोच्यावर सांगितली जाते. लाखो झाडे लावली जातात. प्रत्यक्षात त्याच्यातली किती झाडे जगविण्याचे प्रयत्न केले जातात. याचा विचार व्हायला पाहिजे. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही तर, त्याचे संवर्धन सुद्धा करणे काळाची गरज आहे.

Also Read: शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!

जागतिक पर्यावरण दिन.jpg

दरवर्षी लाखो झाडे लावली जातात परंतु, झाडाचे संवर्धन होत नसल्यामुळे तिथे फक्त खड्डे पाहायला मिळतात. त्यामुळे लावलेल्या वृक्षाला मोठे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून आपण केलेल्या वृक्षारोपणाने पुढच्या काळात हे वृक्ष रुबाबात डोलताना आपल्याला पाहायला मिळतील. वृक्षतोडीने जंगले नष्ट केली जात आहेत. त्यामुळे वन्य प्राणी मानवी वसाहतीकडे वळू लागले आहेत. तसे पाहिले तर वन्य प्राणी आपल्या वसाहतीवर हल्ले करीत नाहीत तर, आपण त्यांच्या वसाहतीवर अतिक्रमण करीत आहोत, असे म्हणायला काही हरकत नाही. सरकार दरवर्षी ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही संकल्पना राबवून वृक्ष लागवड करते पण, त्याचे संवर्धन आपण करीत नाही. वृक्षारोपण करण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःहून सहभाग घेतला पाहिजे. विशेषतः वनविभागाने वृक्षसंवर्धनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

Also Read: होमिओपॅथिक गोळ्यांमधील औषधी घटक तपासले जाणार

वनश्री हीच धनश्री, वृक्ष लावा घरोघरी
सध्या रस्ते रुंदीकरण, बांधकाम, उद्योग धंदे,घरे बांधनी तसेच इतर व्यवसाय उभारणीसाठी वृक्ष तोडली जातात. त्यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होते.हे टाळण्यासाठी शक्य तितके वृक्ष लागवड करून होणारे नुकसान टाळता येऊ शकते. परंतु अशा उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळे केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आतातरी याचा विचार गांभीर्याने करण्यासाठी योग्य ते उपाय योजना हाती घेणे महत्त्वाचे आहे. जंगल संपदा ही मानवी संपत्ती आहे. तेव्हा ‘वनश्री हीच धनश्री, वृक्ष लावा घरोघरी’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.

संपादन – विवेक मेतकर

Plantation in the rainy season for oxygen growth at Washim

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here