म्हसवड (सातारा) : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील (Andhra Pradesh-Karnataka) असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिध्दनाथ (Siddhanath Temple), देवी जोगेश्वरी देवस्थानचे माण नदीपात्रातील पुरातन तीर्थ स्नानकुंडाचे पालिकेने तीर्थक्षेत्र विकास निधीतून (Development Fund) बांधकाम करून जीर्णोध्दार करावा, अशी मागणी येथील माणरत्न सोशल फाउंडेशनतर्फे निवेदनाद्वारे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे केली आहे. (The Poor Condition Of The 800 year old Siddhanath Temple Area Near The River Manganga)
सध्या या दगडी बांधकामातील स्नानकुंडाची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.
यावेळी फाउंडेशनचे लखन मंडले, सागर शिंदे, सुशांत तवटे, सद्दाम पटेल, विशाल नवगण उपस्थित होते. येथील सिध्दनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस माणगंगा नदीपात्रामध्ये सुमारे 800 वर्षांपूर्वी दगडी बांधकाम केलेले पुरातन स्नानकुंड तीर्थ असून हे ठिकाण “श्रीं’चे तीर्थ म्हणून परिचित आहे. येथील “श्रीं’च्या मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक श्रध्देने या तीर्थ कुंडातील माण नदीच्या जलाने स्नान करून मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परंपरा होती.
Also Read: VIDEO पाहा : जावळीत ग्रामीण परंपरेची ‘साक्ष’; जात्यावरच्या ओव्यांतून कोरोना जागृती

सध्या या दगडी बांधकामातील स्नानकुंडाची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. माण नदीपात्रात सिमेंट बंधारे बांधकाम झाल्यामुळे तीर्थस्थळी पुरेसे पाणी उपलब्ध असते. या तीर्थानजीकच दगडी बांधकामातील हेळ असून त्यामध्ये वाळू व गाळ साचून ते नदीपात्रात पूर्णत: गाडले गेले आहे. या ऐतिहासिक हेळातील साचलेला गाळ व वाळूउपसा करून त्याचीही दुरुस्ती करून भाविकांसाठी वापरास खुले करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
The Poor Condition Of The 800 year old Siddhanath Temple Area Near The River Manganga
Esakal