बीड : मराठा समाजाचे आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी शहरातून ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा : लढा आरक्षणाचा’ मोर्चा निघाला आहे. मोर्चेकरी मागण्यांचे फलक आणि भगवे झेंडे हाती घेऊन सहभागी झाले आहेत. ‘जय जिजाऊ जय शिवराय’,‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’,‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही’,अशा घोषणांनी परिसर दणानून गेला आहे. मोर्चामध्ये महिलाही सहभागी झाल्या आहेत. आरक्षण रद्द झाल्यानंतरचा राज्यातला हा पहिलाच मोर्चा आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पुढाकार घेतलेल्या मोर्चात माजी आमदार नरेंद्र पाटील यांनीही सहभाग घेतला आहे.










Esakal