World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसंदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे. पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत बाजी कोण मारणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. न्यूझीलंडचा संघ 2000 पासून आयसीसीच्या मोठ्या इव्हेंटमध्ये अपयशी ठरलाय. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला देखील आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत यशाला गवसणी घालता आलेली नाही. दोन्ही संघ हा इतिहास खोडून नवा पराक्रम करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.

भारतीय संघाचे माजी कसोटी स्पेशलिस्ट व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर भाष्य केले आहे. स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे म्हटले आहे. जो संघ पहिल्या डावात चांगली फलंदाजी करेल, त्याला पहिली ट्रॉफी उंचावण्याची अधिक संधी असेल, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. बॅटिंगने पहिली इनिंग जिंका ट्रॉफी उचला, असाच काहीसा संदेश त्यांनी दिला आहे. इंग्लंडच्या साउथहॅम्प्टन मैदानात रंगणाऱ्या फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचा त्यांना फायनलमध्ये फायदा होईल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, प्रॅक्टिकलीदृष्ट्या या गोष्टीचा न्यूझीलंडला फायदा उठवता येईल. पण भारतीय संघ यामुळे बॅकफूटवर जाईल असे वाटत नाही. फायनलपूर्वी योग्य प्रॅक्टिसच्या माध्यमातून इंग्लिश कंडिशन समजून घेण्यासाठी टीम इंडियाला मिळालेला वेळ पुरेसा वाटतो. मागील काही सामन्यात टीम इंडियाने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, ते पाहता भारतीय संघालाच पहिली पसंती देईन, असे ते म्हणाले.

Also Read: ऑलिम्पिक पूर्वी भारताला धक्का, पैलवान सुमीत डोपिंगमध्ये फेल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हा आयसीसीने सुरु केला एक चांगला उपक्रम आहे. यापूर्वी काहींनी भरपूर कसोटी सामने खेळले. पण वर्ल्ड कपसारखी स्पर्धा कसोटी स्पर्धा अनुभवता आली नाही. आयसीसी रँकिंगमध्ये एखादा संघ नंबर वन पर्यंत पोहचला असला तरी त्याला टेस्टमधील वर्ल्ड चॅम्पियन ही ओळख मिळत नव्हती. या स्पर्धेमुळे ते शक्य होईल, असे मत त्यांनी स्पर्धेसंदर्भात व्यक्त केले.

Also Read: WTC Final: ब्रेट लीची ‘बोलंदाजी’ विराट सेनेला टेन्शन देणारी

विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यासंदर्भात बोलताना लक्ष्मण म्हणाले की, दोघांमध्ये तुलना करणे योग्य वाटत नाही. दोघेही रोल मॉडेल असून ते केवळ आपापल्या देशासाठी नाही तर क्रिकेट जगतातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी खेळाडू आहेत, असे ते म्हणाले. 2007 मध्ये टीम इंडियाला टी-20 चा पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीला आपल्याला आजही आठवतो. 19883 मध्ये कपिल देव यांनी भारतीय संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. ते आजही आपल्या स्मरणात आहे, असे सांगत दोन्ही संघाला आयसीसीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे, असेही लक्ष्मण यांनी म्हटले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here