पुणे : राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता खाजगी संस्थांना व हॉस्पिटलला लसीकरण करण्यास परवानगी देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने पुणे शहरात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Vaccination

खराडी आणि विमाननगर परिसरात सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 18 वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांपर्यंत लसीकरण पोहचवण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

Also Read: ओतूरला मोबाइल टॉवरला आग, जीवितहानी नाही

”या मोहिमेअंतर्गत 12 डॉक्टर, 38 नर्सेस, 120 व्हेंटीलेटर, 6 अॅब्युलन्स या यंत्रणेच्या साहाय्याने एकूण 12 मोठ्या व 48 लहान सोसायटयांमध्ये एका दिवसात सुमारे चार हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे” अशी माहिती माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी दिली.

Also Read: PM मोदींनी पुण्यात केलं इथेनॉल प्रोजेक्टचे उद्घाटन

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here