नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (second wave of corona) नागपूरला सर्वाधिक फटका बसला. एकाचवेळी पाच नवीन स्ट्रेन (five new strain in nagpur) सापडणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर होते. त्यानंतर लॉकडाउन करण्यात आले. जवळपास एक महिन्याच्या लॉकडाउननंतर परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र, अद्यापही शहरात दररोज शंभर-दीडशे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यातच आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात नागपूरचे निर्बंध (unlock nagpur) पूर्णपणे उठविले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, राजकीय सभा यावरही कुठलेही निर्बंध नाहीत. आता कोणाला कोरोनाची भीतीच नाही, याप्रकारे हे पूर्ण नियम उठविणे हे तिसऱ्या लाटेला (third wave of corona) आमंत्रण तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली आहे. (why state government lift all the restrictions in nagpur at once)
Also Read: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टीक हटवलं
काय असणार सुरू?
सर्व दुकाने, बाजारपेठा, सरकारी आणि खासगी कार्यालये, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, राजकीय सभा, सभागृह, चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्स, खेळांची मैदाने यासह सर्व सरसकट सुरू राहणार आहे. त्यावर वेळेचं कुठलंही बंधन नाही. लग्नात देखील उपस्थितांची संख्या ठरवून देण्यात आलेली नाही.
एप्रिल महिना आठवला की येतो अंगावर काटा –
कोरोनाची पहिली लाट जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालली. त्यानंतर राजकीय सभा, ग्रामपंचायत निवडणुका आणि लग्नासाठी काही निर्बंध असतानाही हजारोंच्या उपस्थिती लग्न उरकली. याशिवाय व्हायरस म्युटेशन यामुळे दुसरी लाट आली. कोरोनाचे रुग्ण सापडत असूनही लॉकडाउन लावायला उशिर झाला. लॉकडाउन लागला तोपर्यंत नागपुरातील कोरोनाची रुग्णसंख्या ही आवाक्याबाहेर पोहोचली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दिवसाला ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. परिस्थिती इतकी गंभीर झाली, की रुग्णाला बेड मिळत नव्हते. व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला. दिवसाला १२० जणांचे मृत्यू झाल्याचाही दिवस नागपूरकरांनी पाहिला आहे. सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये जागा मिळच नव्हती. तर हजारो रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत होते. याच काळात औषधांचा काळाबाजार झाला. त्याचाही फटका रुग्णांना बसला. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत होते. त्यानंतर १ एप्रिलला लॉकडाउन घोषित झाला. मात्र, रुग्णसंख्येचा आलेख उंचावत होता. एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले होते. ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आयात केल्यानंतर शहरातील परिस्थिती हळूहळू सुधारत आली. मे महिन्याच्या शेवटी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली. पण, आता देखील परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. अजूनही दररोज दोनशेच्या घरात रुग्ण सापडत आहेत.
शुक्रवारी १९७ नवे रुग्ण, तर १० मृत्यू –
शुक्रवारी जिल्ह्यात १९० बाधित आढळून आले. यात शहरातील संख्या अधिक आहे. शहरात १२० तर ग्रामीणमध्ये ७३ बाधित आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४ लाख ७५ हजार ३९९ पर्यंत पोहोचली. तसेच शुक्रवारी १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूंची आकडेवारी ही ८ हजार ९४३ पर्यंत पोहोचली आहे. अजूनही रुग्णसंख्या ही शून्यावर आलेली नाही. त्यामुळे सरकारने सरसकट सर्व निर्बंध उठविणे याबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे.
लसीकरण कमी असताना लॉकडाउन उठविण्याची घाई?
नागपूर शहरात लसीकरणासाठी पात्र असलेली लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. त्यामधून फक्त ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ५ लाख १३ हजार जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर फक्त १ लाख ६७ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असे नाही. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यातच इतक्या कमी प्रमाणात लसीकरण झाले असतानाही सरसकट निर्बंध उठविण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.




दरम्यान, राज्य शासनाने हे निर्बंध लागू केले असले, तरी प्रत्येक महापालिकेला स्वतंत्र युनिट म्हणून घोषित केले आहे. त्यात आता महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Esakal