येरवडा : कोंढवा येथील टिळेकरनगर आजुबाजुला उंच उंच इमारती.. या इमारतींच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत फकिरांची वीस पालं.. दुपारची दोन ते सव्वादोनची वेळ..मंगळवार पेठेतील रिक्षाचालक सलीम शेख भाडे घेऊन जात असताना त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला.. ते आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर त्यांना पालात आई मुलाला शांत करताना दिसली.. भुकेमुळे मुल रडत असल्याचे शेख यांना कळाले. त्यांनी आईजवळील रडणाऱ्या मुलाचे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल केले… अवघ्या काही तासात या कुटुंबांना शिधा मिळाल्यामुळे त्याच्या पालातील चूल पेटली… आणि रडणाऱ्या मुलांचा आवाज शांत झाला.(A Rickshaw Driver help for Families starving for food by using Social Media)
मध्यप्रदेशातील फकिरांची अडीचशे कुटुंब गेली सतरा वर्षांपासून पुण्याच्या उपनगरांमध्ये मोकळ्या जागेत पालं टाकून राहत आहेत. ते नेहमी एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरात स्थलांतर करीत आहेत. त्यांचा पारंपारिक व्यवसाय चाकु व सुऱ्यांना धार करणे आहे. पावसाळ्यात छत्रया दुरूस्त करणे, हिवाळ्यात गरम चादर विकणे असे लहान सहान व्यवसाय या कुटुंबातील लोक करतात. तर काहीजण शहरातील चौकात विविध वस्तूंची विक्री करतात. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय नाही कि कोणत्या वस्तूंची विक्री नाही त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.

Also Read: बारावीच्या मूल्यमापनाची पद्धत ठरविण्यासाठी CBSCला 10 दिवसाची मुदत
शिवा सलान म्हणाला, ‘‘ गेली सतरा वर्षे पुणे शहरातच भटकंती करीत आहोत. राहण्यासाठी घर नाही कि कायमची कोणती नोकरी. त्यामुळे पारंपारिक चाकु व सुऱ्यांना धारकरणे, छत्री दुरस्त करणे, सिग्नलवर वस्तू विकणे असे व्यवसाय करतो. मुलांच्या शिक्षणासाठी कोणती शाळा आहे. ना कोणत्या सरकारी दुकानात रेशनचे धान्य मिळते. ना कोणीकडून उसणे घेता येते. त्यामुळे गेली महिनाभर खूप हाल झाले. भुकेमुळे लहान मुलांचे रडणे असह्य होत होते. मात्र काहीच करता येत नव्हते.’’
मंगळवार पेठेतील रिक्षा चालक सलिम शेख भाडे घेऊन कोंढव्यात गेले होते. ते परत येत असताना त्यांना पालात रडणाऱ्या मुलाचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी ते छायाचित्र समाजमाध्यांवर टाकल्यानंतर काही तासात ‘सेंटर फॉर युथ डेव्हलोपमेंट अॅण्ड अॅक्टिव्हिटी’ या सामाजिक संस्थेचे राहुल गरूड यांना कळली. त्यांनी तत्काळ फकिरांच्या वीस कुटुंबांना महिनाभराचे रेशन किट दिले. त्यानंतर त्यांच्या पालातील चुल पेटल्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्यांच्या चेहऱ्यांवरही हासू उमटले.

Esakal