बुलढाणा : कोरोना महामारीत बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत‌. अनेक घरातील कमवती माणसं वारली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. अशा 50 कुटूंबातील एका सदस्याला ईश्वेद बायोटेक कंपनी नोकरी देणार आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली आहे. ईश्वेद बायोटेक ही कंपनी शेतीशी संबंधित असल्यामुळे कोरोना संकटात आधार गमावलेल्या कुटूंबातील अशिक्षित व्यक्तीलाही नोकरी देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना कुटुंबाचा खर्च भागविता येणार आहे. पिडित कुटूंबाचा खूप मोठा ताण कमी होणार आहे. (Ishved Biotech from Buldana will provide jobs to 50 destitute people in Corona)

खरंतर,कोरोना संकटात सापडलेल्यांना आधार देण्याचा विचार वायाळ हे गत काही महिन्यांपासून करत होते. अखेर, त्यांनी कोरोना संकटात सापडलेल्यांना नोकरी देण्याचा सर्वोत्तम निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्यांचे कोणी वाली नाही, त्यांना सक्षम करण्यासाठी ईश्वेदची स्थापना झाली आहे.

Also Read: ५० गाई फुलवतात १०० एक्कर शेती, दरवर्षी
होतंय लाखोंचं उत्पन्न

तसेच, महिलांना रोजगार देऊन त्यांना खंबीर बनविण्याचे कामही ईश्वेदने केले आहे. विशेष म्हणजे उद्योगपती वायाळ यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिला आणि अपंगांसाठी आरक्षण ठेवून त्यांना नोकरी दिली आहे. त्यांच्या टिश्यू कल्चर कंपनीमध्ये पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाते. हजारो बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ईश्वेद प्रयत्नशील आहे.

Also Read: बापरे! चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंटवरून पैशांची मागणी?

Also Read: शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!

अशातच, कोरोना संकटात सापडलेल्यांना नोकरी देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. ज्या कुटूंबातील कमवत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले, त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी ईश्वेद बायोटेक कंपनी, सिंदखेडराजा येथे संपर्क करावा. यासोबतच,Email : careers@ishvedbiotech.com इमेल आयडीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन उद्योगपती संजय वायाळ यांनी केले आहे.

संपादन – विवेक मेतकर

Ishved Biotech from Buldana will provide jobs to 50 destitute people in Corona

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here