पिंपरी – लॉकडाउन (Lockdown) सुरू झाला आणि वातावरणात (Environment) भरमसाट बदल घडून आले. निसर्गातील चक्र बदलले. ढगांमध्येही विविध छटा (Shades of Clouds) दिसल्या. विविध रंगांचे आच्छादन आले. फुलांचे गुच्छ व सोनेरी लहरींप्रमाणे विविध स्वरुपातील पांघरून ढगांनी घेतले. पर्यावरणातील हे बदल पर्यावरण विभागामध्ये शिकणाऱ्या व निसर्गाची (Nature) आवड असणाऱ्या शहरातील एका २२ वर्षीय युवकाने यावर्षीच्या मार्च व एप्रिल महिन्यांत कुतूहलापोटी टिपले आहेत. ( Pune Boy Suyash Gore Clicks Shades of Clouds )

‘क्युमलस’, ‘२२ डिग्री हॅलो’, ‘मॅमॅटस’, ‘अनड्युलाटस’, ‘लॅक्युनसस’, ‘अल्टोक्युमलस’, ‘स्टारटो क्युमलस’, ऑल इन वन या ढगांच्या छबीसह रेनबो, सन व विजांचे फोटो त्याने टिपले आहेत. यातील ‘२२ डिग्री हॅलो’ हा प्रकृतीने बनविलेला अद्भुत बाब आहे. ‘मॅमॅटस’ याला मामाही संबोधले जाते.














Esakal