जळगाव : भारतीय जनता पक्षात (BJP) काही लोकांनी माझा भरपूर छळ केला. माझ्यावर खोटे आरोप लावून विविध चौकश्या लावल्या. आणि त्यामुळे कंटाळून पक्ष सोडला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने मला साथ दिली. त्यामुळे आता कोणताही परिस्थितीत मी राष्ट्रवादीपक्ष सोडणार नाही. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी (NCP leader Eknath Khadse) व्यक्त केले. (eknath khadses explanation that ncp will not leave)
Also Read: सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) हे वादळ व पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौऱ्यावर आले होते. यावेळी ते जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथील कोथळीमधील एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांची भेट घेतली होती. यावेळी श्री. देवेंद्र फडणवीस व श्री. एकनाथ खडसे यांचा दूरध्वनीवरून संवाद झाला होता. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपच्या सोबत जाण्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगू लागली होती.

जेवणाचा केला होता आग्रह
या बाबत पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले, की होय फडणवीस व माझी दूरध्वीद्वारे चर्चा झाली होती. संजय सावकारे यांनी फोन लावून दिला त्यावेळी फडणवीस यांच्याशी आपण बोललो त्यांची चौकशी केली. त्यांना जेवून जाण्याचा आग्रह केला, मात्र त्यांचा व्यस्त दौरा असल्याने त्यांनी पुढच्या वेळी येईल असे सांगितले याउपर आमचे काही बोलणे झाले नाही.
छळामूळेच भाजपा सोडली
भाजपमध्ये पून्हा जात असलेल्या चर्चेवर खडसे म्हणाले, भाजप मध्ये असताना काही लोकांनी आपला भरपूर छळ केला, आपल्यावर खोटे आरोप लावले, त्याच माध्यमातून आपली चौकशी लावली, पुन्हा दाऊदच्या बायकोशी संभाषण केल्याचा आपल्यावर आरोप लावण्यात आला. त्यानंतर आपली एटीएस कडून चौकशी झाली. त्यानंतर आपल्याकडे संपत्ती भरपूर असल्याचा आरोप झालं त्यानंतर आपली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाली. दोन वेळा इन्कम टॅक्स ची आणि आता इडी ची चौकशी झाली. काही कारण नसताना चौकशीच्या माध्यमातून आपला छळ केला आणि त्यामुळेच आपण पक्ष सोडला.
Also Read: पर्यावरणपूरक उत्पादनातून धुळ्याच्या तरुणाची सातासमुद्रापार झेप !
शरद पवारांनी आधार दिला..
या काळात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपल्याला आधार दिला, सगळ्या चौकशाना संघर्ष करण्याची शक्ती मिळाली. ज्या पक्षांमुळे मला ताकत मिळाली. भाजपमध्ये असतो तर आपल्या या चौकशा सुरूच राहिल्या असत्या. भाजपमध्ये आपला सत्तेच्या लालसेपोटी काही लोकांनी आपला छळ केला त्यामुळेच आपण पार्टी सोडली असा स्पष्ट भाषेत सांगितले.
Esakal