सातारा : सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) आकड्यांत चढ-उतार सुरु असली, तरी धोका कायम आहे. मागील आठवड्यात दोन हजारावर असणारी बाधितांची (Corona Patient) संख्या आता पंधराशेवर आल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, मृत्यूच्या आकडेवारीत वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे साताऱ्यातील मृत्यूचा दर चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1394 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 1394 Citizens In Satara District Today Satara Marathi News)

सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यांत चढ-उतार सुरु असली, तरी धोका कायम आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 92 (7862), कराड 252 (23285), खंडाळा 157 (10859), खटाव 74 (16709), कोरेगांव 116 (14982), माण 43 (11856), महाबळेश्वर 3 (4102), पाटण 56 (7247), फलटण 212 (27072), सातारा 294 (36524), वाई 81 (11879) व इतर 14 (1102) असे आजअखेर एकूण 173479 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

Also Read: पहिला परदेशात जाणाऱ्यांना लस द्या; खासदार पाटलांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना

CORONA

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 4 (175), कराड 5 (669), खंडाळा 1 (139), खटाव 3 (428), कोरेगांव 3 (331), माण 0 (225), महाबळेश्वर 0 (44), पाटण 1 (161), फलटण 2 (260), सातारा 6 (1085), वाई 2 (311) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 1394 Citizens In Satara District Today Satara Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here