T20 World Cup 2021: भारतामध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये नियोजित टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेचे आयोजन यूएई (UAE) आणि ओमानमध्ये करण्याची तयारी सुरु झाली आहे. देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कप स्पर्धा भारतात घेण्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दुबईमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत वर्ल्ड कपसंदर्भातील निर्णय घेण्यासंदर्भात BCCI ला 28 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. देशातील कोरोनाजन्य परिस्थितीमुळे 19 (COVID-19) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धा भारताबाहेर घेण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात बीसीसीआयने (BCCI) अंतर्गतरित्या आयसीसीला (ICC) या स्पर्धेच्या तयारीसंदर्भात सूचना दिल्याचे समजते. आयपीएलप्रमाणेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पहिल्यापासूनच युएईला पहिली पंसती होती.

ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अबू धाबी, दुबई आणि शारजाहसह ओमानची राजधानी मस्कट ठिकाणाचा विचार झाल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गोपियनिय ठेवण्याच्या अटीवर पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीच्या बैठकी दरम्यान बीसीसीआयने वर्ल्ड कपसंदर्भात औपचारिक निर्णयासाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला आहे. यजमान पदाचा अधिकार कायम ठेवत संयुक्त अरब अमीरात आणि ओमान या ठिकाणी स्पर्धा घेण्याची तयारी बीसीसीआयने दर्शवली आहे.

Also Read: ENGvsNZ : साउदीचा भेदक मारा; साहेबांचा संघ गडबडला (VIDEO)

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 16 संघाचा सहभाग असलेल्या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यासाठी मस्कट या शहरास विशेष रुपात मेजवानी देण्याचा विचार झाला आहे. यामुळे आयपीएल (IPL 2021) च्या 31 सामन्यांची मेजवानी करणाऱ्या युएईतील तीन मैदाने वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठी तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. जर आयपीएल स्पर्धा 10 ऑक्टोबरपर्यंत आटोपून नोव्हेंबरपासून टी-20 वर्ल्ड कपचे सामने याठिकाणी घेता येतील. ओमानमध्ये सुरुवातीचे सामने घेतल्यामुळे आंतरारष्ट्रीय स्तरावरील सामन्यासाठी युएईतील मैदानावरील खेळपट्टी तयार करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मिळेल.

Also Read: गुगली टाकायला बायकोनं शिकवलं! राशिदनं घेतली युजीची फिरकी

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अधिकाधिक वेळ काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे आयसीसी बोर्डातील बहुतांश सदस्यांचे मत आहे. सध्याच्या घडीला देशात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे चित्र दिसत नाही. 28 जून रोजी आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकत नाही, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. आयपीएलसाठी दुबईमध्ये आलेले खेळाडू वर्ल्डकपसाठी याच ठिकाणी आपल्या संघाला जॉईन होऊ शकतील, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here