England vs New Zealand, 1st Test : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फेरले. हा दिवस वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी टिम साउदीने यजमानांचे कंबरडे मोडले. त्याच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांची तारंबळ उडाली. जेम्स ब्रेसीच्या रुपात त्याने इंग्लंडला सहावा धक्का दिला. इंग्लंडकडून पदार्पणातील सामना खेळणाऱ्या विकेट किपर फलंदाजाला त्याचा चेंडू कळलाही नाही. बॅट आणि पॅडमध्ये अधिक अंतर असल्यावर काय होते? याचा अनुभव त्याने घेतला. त्याने सहा चेंडूचा सामना केला. (ENGvsNZ Tim Southee fire New Zealand will look to get quick wickets on Day 4 of first Test)
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग केली. सलामीवीर डेवोन कॉन्वेचे द्विशतक आणि हेन्री निकोलसने केलेल्या 61 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 378 धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमान इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. जेमीसनने डॉमिनिक सिब्लेला खातेही उघडू दिले नाही. 7 चेंडूचा सामना करुन तो माघारी फिरला. धावफलकावर अवघ्या 18 धावा असताना झॅक क्राउलेनं मैदान सोडलं. साउदीन त्याची विकेट घेतली. तो संघाच्या धावसंख्येत अवघ्या 2 धावांची भर घालू शकला.
Also Read: मुजरा! मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ‘हा’ टिकटाॅक व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का?
Tim Southee is on fire #ENGvNZ #ENGvsNZ
— ABDULLAH NEAZ (@AbdullahNeaz) June 5, 2021
Also Read: सचिनकडून कोरोना नियमाचे उल्लंघन? पुण्यात गोल्फचा घेतला आनंद
त्यानंतर सलामीवीर रॉय बर्न्स आणि कर्णधार जो रुटने इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. 113 चेंडूत 43 धावा करणाऱ्या जो रुटला जेमीसनने माघारी धाडले. ओली पोपला 22 धावांवर बाद करत साऊदीने प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढवल्या. डॅनियल लॉरेन्सलाही त्याने खाते उघडू दिले नाही. त्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली आहे. चौथ्या दिवशीच्या खेळातील उपहारापर्यंत इंग्लंडच्या धावफलकावर 6 बाद 164 लागल्या होत्या. रॉय बर्न्स 203 चेंडूचा सामना करुन 73 धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला ओली रॉबिन्सन 48 चेंडूत 16 धावा करुन नाबाद होता.

Esakal