England vs New Zealand, 1st Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडच्या मैदानात धमाकेदार कामगिरी केलीय. लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी प्रभावी मारा करत यजमान इंग्लंडचा पहिला डाव 275 धावांत आटोपला. साऊदी आणि जेमीनसन या दोघांनी इंग्लंडच्या 9 विकेट घेतल्या. त्यांचा जबरदस्त मारा हा इंग्लंडमध्ये क्वारंटाइनमध्ये असलेल्या टीम इंडियाची झोप उडवणारी अशीच आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना रंगणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात 378 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील 103 धावांच्या आघाडीसह त्यांनी दुसऱ्या डावाला सुरुवात केली. (New Zealand Fast Bowler Tim Southee And Kyle Jamieson Took Nine Wickets)

Also Read: ENGvsNZ : साउदीचा भेदक मारा; साहेबांचा संघ गडबडला (VIDEO)

टिम साउदीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत 25.1 षटकात केवळ 43 धावा खर्च करुन 6 विकेट घेतल्या. लॉर्ड्सच्या मैदानात त्याने दुसऱ्यांदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम करुन दाखवला. दुसऱ्या बाजूला कायले जेमीनसन याने त्याला उत्तम साथ दिली. त्याने 85 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. इंग्लंडच्या संघाकडून रॉरी बर्न्सने एकाकी झुंज दिली. त्याने 297 चेंडूत 132 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार जो रुट 42 (113) आणि ओली रॉबिन्सन 42 (101) धावांची खेळी वगळता अन्य एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. साउदीने बर्न्सला बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.

Also Read: गुगली टाकायला बायकोनं शिकवलं! राशिदनं घेतली युजीची फिरकी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झालाय. तीन दिवसांच्या कठोर क्वारंटाइन नंतर संघातील खेळाडूंना प्रक्टिस करता येणार आहे. भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार असून याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. दुसरीकडे भारतीय संघाचे त्यांच्या या दोन्ही सामन्यावर लक्ष असेल. पहिल्या कसोटी सामन्यात जलदगती गोलंलदाजांनी केलेल्या माऱ्यामुळे टीम इंडियाची झोपही उडाली असेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here