वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यात (Maval Tahsil) पंधरा दिवसांपूर्वी ऑक्‍सिजन (Oxygen) व व्हेंटिलेटर बेड (Ventilator Bed) मिळविण्यासाठी कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) नातेवाइकांना मोठी धावपळ करावी लागत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने सर्वच हॉस्पिटलमधील मोठ्या प्रमाणावरील बेड रिकामे (Empty Bed) असल्याचे चित्र आहे. (Corona Patients Decrease in Maval Tahsil)

तालुक्‍यात पंधरा-वीस दिवसांपूर्वी दररोज दोनशेच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे विलगीकरण कक्षाबरोबरच सर्वच हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाले होते. लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांना घरीच थांबविण्याची वेळ आली होती. गंभीर लक्षणे आढळलेल्या रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळविणे दुरापास्त झाले होते. ते मिळविण्यासाठी नातेवाइकांना मोठी धावपळ करावी लागत होती. परंतु, गेल्या सात-आठ दिवसांपासून तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. तपासण्यांची संख्याही कमी झाली आहे. पूर्वी शासकीय व खासगी अशा दोन्ही ठिकाणच्या तपासणी केंद्रांमध्ये दररोज सुमारे आठशे जणांची तपासणी होत होती. आता ती चारशे ते साडेचारशेच्या घरात आली आहे. त्यामुळे दररोज पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या शंभराच्या घरात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही (९४.४८ टक्के) वाढले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आता बेडची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बहुतांशी हॉस्पिटलमधील बेड आता रिकामे असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात चार कोविड केअर सेंटर, २८ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व एक डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल आहे.

Also Read: पिंपरी-चिंचवडमध्ये आज २२४ नवीन रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी व उपचारासाठी तालुक्‍यात चार शासकीय कोविड केअर सेंटर आहेत. त्यात तळेगाव येथील सुगी पश्‍चात केंद्र, इंदोरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट, वाकसई येथील समुद्रा इन्स्टिट्यूट व लोणावळा, अशा चार कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ५८१ बेड असून, त्यातील २३६ बेड भरलेले; तर ३४५ बेड खाली आहेत.

सध्या कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण घटल्याने तपासणीला येणाऱ्या नागरिकांची संख्याही घटली आहे. सहाजिकच कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु, नागरिकांनी गाफील न राहता खबरदारी बाळगावी व कोरोनाविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

– डॉ. चंद्रकांत लोहारे, मावळ तालुका आरोग्याधिकारी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here