कोलकाता- पश्चिम बंगालच्या कांथीमध्ये भाजप नेता सुवेंदू अधिकारी (BJP Suvendu Adhikari ) आणि त्यांच्या भावाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या आरोपानंतर अधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या भावाने नगरपालिकेतून मदत साहित्य (Relief Material ) चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका झाल्यापासून भाजप आणि टीएमसीमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचा पराभव केला होता. (BJP Suvendu Adhikari Brother Accused Of Stealing Relief Material Case Filed)

चक्रीवादळ यास पश्चिम बंगालमध्ये धडकल्यानंतर ममता सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत उपस्थित नव्हत्या. या घटनेनंतर केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राहिलेले अलपन बंडोपाध्याय यांची दिल्लीमध्ये बदली केली होती. पण, ममतांनी ती नाकारली. त्यानंतर अलपन आता ममता सरकारचे मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत.

Mamta Banerjee

अलपन यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या बैठकीत उपस्थित न राहण्याचे कारणही त्यांनी केंद्र सरकारला कळवलं आहे. पण, अलपन यांच्या उत्तरानंतरही केंद्र सरकार मागे हटण्याच्या तयारीत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार अलपन बंडोपाध्याय यांच्याविरोधात केंद्र सरकार कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Also Read: चक्रीवादळं, पर्यावरणबदल आणि सुंदरबन

केंद्रीय गृह मंत्रालयाने निवडणूक निकालानंतर सुवेंदू अधिकारी, त्यांचे वडील आणि भाऊ यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मंत्रालयाने दोन्ही संसद सदस्यांना वाय प्लस (Y+) कॅटेगरीची सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. सीआरपीएफचे जवान त्यांची सुरक्षा करतील. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी शिशिर अधिकारी यांनी भाजपचा हात धरला होता. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे ममता बॅनर्जींचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालंय. दुसरीकडे भाजप मुख्य विरोक्षी पक्ष म्हणून समोर आला आहे. काँग्रेस आणि डाव्यांना एकही जागा मिळू शकल नाही.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here