सातारा : मोसमी पावसाने (rain) शनिवारपासून जिल्ह्यात हजेरी लावल्याने वातावरण पुर्णतः बदलून गेेले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत विविध भागात पडलेल्या पावसामुळे रस्ते, नाले भरुन वाहत हाेते. आजही (रविवार) सकाळपासून विविध भागात ढगाळ वातावरण आहे. सातारा शहरात अधून पावसाची सरी काेसळत आहेत. (satara-marathi-news-rainfall-karad-lonand-phaltan)

दोन दिवस आधीच दाखल होत आश्‍चर्याचा सुखद धक्का दिलेल्या मोसमी पावसाने शनिवारी सातारा जिल्ह्याच्या विविध भागांला अक्षरशः झोडपून काढले. सातारा शहर आणि तालुक्‍यात, तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत त्याने मुसळधार सलामी दिली. सुमारे एक तासाहून अधिक काळ झालेल्या या पावसाने सातारा शहरातील सखल भागात पाणी साठून राहिले होते. तालुक्‍यातील मांडवे येथेही ढगफुटीसदृश पावसाने पाणीच पाणी करून टाकले. खटाव तालुक्‍यात पुसेगाव, वर्धनगड, बुध, फलटण परिसरातही जोरदार पाऊस झाला.

Also Read: Maharashtra Unlock : सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश!

शहरातील वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली होती. त्यातच दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. दुपारी तुरळक पाऊस झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह तालुक्‍याच्या विविध भाग या पावसाने झोडपून काढला. सुमारे एक तासाहून अधिक काळ पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साठून राहिले होते.

उंडाळेत ढगफुटीसदृश

उंडाळे परिसरात शनिवारी दुपारी चारनंतर ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे दक्षिण व उत्तरमांड नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने कऱ्हाड- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

शनिवारी दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास परिसरामध्ये पाऊस पडला. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, ओढे, नाले पाण्याने भरून वाहिले. कऱ्हाड- रत्नागिरी महामार्गावरील उत्तरमांड नदीवरील ओंड -उंडाळे दरम्यानचा पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे पर्याय रस्ताने वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, त्या मार्गावरील पूल पाण्याखाली गेला. तुळसण फाटा ते उंडाळे दरम्यान पाणी रस्त्यावर आल्याने कऱ्हाड-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली. सलग पावसाने आंतरमशागतीची कामे ठप्प झाली आहेत. ओढ्याकाटावरच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी पाण्यात गेल्या. शेतकऱ्यांनी आडसाली लावणी लावल्या. मात्र, प्रचंड पावसाने शेतजमीन वाहिल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

Undale

Also Read: देश प्रगतीपथावर असताना पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही : उदयनराजे

लोणंद व परिसरातशनिवारी संध्याकाळी तासभर मुसळधार पाउस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्ते, नाले पाण्याने भरून वाहत होते. अनेक ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. उन्हाळी पिकांना व खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीस, तसेच खरिपाच्या पेरण्यांनाही हा पाउस उपयुक्त आहे.

Also Read: Good News : जिल्हा बॅंकेकडून व्हेंटिलेटरसाठी तीन कोटी; आमदार शिवेंद्रसिंहराजे, रामराजेंचा पुढाकार

मांडवेतील महिलेचा पुरात वाहून मृत्यू

नागठाणे : मांडवे (ता. सातारा) येथे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृतदेह गावालगत सापडला. मधुमती सुधाकर माने (वय 65) असे या महिलेचे नाव आहे. माजी सरपंच राजेंद्र माने यांच्या त्या मातोश्री होत. जनावरे घेऊन त्या गावालगत असलेल्या माकडजाई पायथा या शिवार परिसरात गेल्या होत्या. सायंकाळी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर घरी परतत असताना ओढ्याला आलेल्या पुरात त्या वाहून गेल्या. गावालगत त्यांचा मृतदेह ग्रामस्थांना ओढ्याकाठी असलेल्या झुडपात आढळला.

ब्लाॅग वाचाEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here