नुकताच बहुचर्चित ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सिरीजमधील कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
या वेब सिरीजमधील जे.के. तळपदेची भूमिका करणारा अभिनेता शारिब हाश्मीच्या अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या वेब सिरीजमध्ये शारिबने मनोज वाजपेयी यांच्या मित्राचे काम केले आहे.
2008 मध्ये त्याने ऑस्कर विजेता चित्रपट ‘स्लमडॉग मिलियनेयर’ मध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच 2012 मध्ये त्याने शारूख खान सोबत ‘जब तक है जान’ या चित्रपटामध्ये काम केले.
शारिबला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याचे वडिल एका चित्रपट मासिकेमध्ये एडिटरचे काम करत होते.
शारिबने गोविंदा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या हम तुम पर मारते हैं या चित्रपटामध्ये असिस्टेंट डायरेक्टरचे काम केले.
शारिबच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप अडथळे आले. एका मुलाखतीमध्ये शारिबने सांगितले की, अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याआधी तो नोकरी करत होता.
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्याने बायकोचे दागिने देखील विकले. नोकरी करत असतानाच त्याने दोन चित्रपटांचे शूटिंग केले. त्यानंतर अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याने नोकरी सोडली. काही दिवसांनंतर नोकरी सोडल्यामुळे शारिबने केलेली सर्व सेविंग संपली. अशावेळी घर चालवण्यासाठी आणि दोन मुलांना सांभाण्यासाठी त्याला बायकोचे दागिने विकावे लागले.

Esakal

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here